मजुरीच्या मोबदल्यासाठी जिल्हाकचेरीसमोर उपोषण

By Admin | Updated: September 9, 2016 00:33 IST2016-09-09T00:33:29+5:302016-09-09T00:33:29+5:30

मोर्शी तालुक्यातील निंभा, पिंपळखुटा, पाळा, आणि मनिमपूर येथील मजूरांचे थकीत मजूरी देण्यात यावी व अन्य

Fasting before District Collector to pay wages | मजुरीच्या मोबदल्यासाठी जिल्हाकचेरीसमोर उपोषण

मजुरीच्या मोबदल्यासाठी जिल्हाकचेरीसमोर उपोषण

न्यायासाठी लढा : गाडगेबाबा श्रमिक संघटनेचे आंदोलन
अमरावती : मोर्शी तालुक्यातील निंभा, पिंपळखुटा, पाळा, आणि मनिमपूर येथील मजूरांचे थकीत मजूरी देण्यात यावी व अन्य काही मागण्यासाठी गाडगेबाबा श्रमिक संघटनेने माजी झेडपी सदस्य अनिल खांडेकर यांच्या नेतुत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवार पासून उपोषण सुरू केले आहे.
उपोषण कर्त्याच्या प्रमुख मागण्यामध्ये मोर्शी तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वृक्षसंगोपन कार्यक्रम २०१३ ते १५ या कालावधीत् राबविण्यात आलेल्या कामांचा मोबदला अद्यापही थकीत आहे .त्यामुळे थकीत कामांचा मोबदला त्वरीत देण्यात यावा, या प्रकरणी दोषी असलेल्या गटविकास अधिकाऱ्यांवर कारवाई करावी,कामाची मागणी करणाऱ्या मजूरांना तातडीने कामे देण्यात यावी,स्वामिनाथन आयोग लागू करावा,आदी मागण्यासाठी गाडगेबाबा श्रमिक संघटना मोर्शी तालुक्याचे वतीने बेमुदत उपोषण सुरू आहे.
या उपोषणाचा गुरूवार हा दुसरा दिवस आहे. उपोषण कर्त्यामध्ये अनिल खांडेकर,वासुदेव ठाकरे, विका इंग़ळे, बाळू कोरे, राजू मेटकर, सिध्दार्थ धाकडे, विश्र्वनाघ सोनोने, दिलीप बोळवार, सुरेश ठाकरे, श्रीकृष्ण सिरसाट, चरणदास परतेती, सुनिल अढाऊ, अशोक काठोळे, अरूण उईके, अजराज खॉ आदीचा समावेश आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Fasting before District Collector to pay wages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.