शेती करायची की, सोडून द्यायची? तणनाशक, खते दुप्पट महागले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2022 05:01 IST2022-05-22T05:00:00+5:302022-05-22T05:01:01+5:30
रासायनिक खतांच्या किमतीत वर्षभरात तिसऱ्यांदा वाढ झालेली आहे. कीटकनाशक व बियाण्यांचीही दरवाढ झालेली आहे. याशिवाय डिझेलची दरवाढ झाल्याने टॅक्टरद्वारे मशागतीचाही खर्च वाढला आहे. शेतकऱ्यांचा माल निघताच बाजारात हमीभावापेक्षा कमी भावाने खरेदी केली जाते. व्यापाऱ्यांच्या षङ्यंत्राचा शेतकरी बळी ठरत असताना शासन-प्रशासन गप्प आहे. कुणावरही कारवाई होत नाही, त्यामुळे शेती हा न परवडणारा धंदा झाल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे.

शेती करायची की, सोडून द्यायची? तणनाशक, खते दुप्पट महागले!
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : रासायनिक खतांच्या किमतीत वर्षभरात तिसऱ्यांदा वाढ झालेली आहे. कीटकनाशक व बियाण्यांचीही दरवाढ झालेली आहे. याशिवाय डिझेलची दरवाढ झाल्याने टॅक्टरद्वारे मशागतीचाही खर्च वाढला आहे. या सर्वांमुळे उत्पादन खर्च वाढला असल्याने शेती आता करायची की सोडून द्यायची, या मानसिकतेत काही शेतकरी आलेले आहे.
शेतकऱ्यांचा माल निघताच बाजारात हमीभावापेक्षा कमी भावाने खरेदी केली जाते. व्यापाऱ्यांच्या षङ्यंत्राचा शेतकरी बळी ठरत असताना शासन-प्रशासन गप्प आहे. कुणावरही कारवाई होत नाही, त्यामुळे शेती हा न परवडणारा धंदा झाल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे.
दरवर्षी बियाणे, खते, कीटकनाशके, मशागत, मजुरीचे दरवाढ होत असल्याने शेतीचा उत्पादन खर्च वाढला आहे. त्या तुलनेत उत्पन्न होत नाही, याशिवाय शेतमालाचा भावही मिळत नाही, त्यामुळे जिरायती शेती न करता सोडून दिलेली बरी, असे वाटायला लागले आहे.
- राबसाहेब खंडारे, शेतकरी
डिझेलची दरवाढ झाल्याने टॅक्टरद्वारे शेती मशागतीचा खर्च दुपटीने वाढला आहे. याशिवाय कृषी निविष्ठांच्या किमतीदेखील वाढल्या आहे. मजुरीचे दर वाढले आहे. हंगामात शेतमाल निघाले ही दरवर्षी भाव पाडले जातात. यामुळे उत्पादन खर्चही वाढत असल्याने शेती आता परवडत नाही.
- रामदास बोंडे, शेतकरी.