शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

तळणी येथे शेतकरी महिलेची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 20:17 IST

मोर्शी (अमरावती) : तालुक्यातील तळणी येथील शेतकरी कुटुंबातील वृद्धेने आर्थिक विवंचनेत राहत्या घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

मोर्शी (अमरावती) : तालुक्यातील तळणी येथील शेतकरी कुटुंबातील वृद्धेने आर्थिक विवंचनेत राहत्या घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सततची नापिकी व मुलाचे मागील काही वर्षांपासूनचे आजारपण यामुळे ८२ वर्षीय वृद्ध महिलेने हे टोकाचे पाऊल उचलले. अन्नपूर्णा माणिकराव तिडके असे मृत महिलेचे नाव असून ती मागील काही दिवसांपासून आर्थिक विवंचनेत चिंताग्रस्त असायची.वृद्ध महिलेला राजेंद्र तिडके नामक मुलगा असून त्यांनी चार मुलींचे लग्नकार्य केल्यामुळे त्यांच्यावर कर्जाचा डोंगर उभा होता. त्यातच मागील ३ ते ४ वर्षांपासून सततची नापिकी व सेंट्रल बँक आॅफ इंडियाचे कर्जही होते. यावर्षी सोयाबीन व भेंडीच्या उत्पादनात तोटा झाला असून पीक हाती न घेता नांगरणी केली होती. त्यातच काही वर्षांपासून राजेंद्र तिडके यांना रक्ताची कमतरतेचा आजार जडल्यामुळे औषधोपचाराचा खर्चही वाढला होता. त्यामुळे घराची जबाबदारी अन्नपूर्णा तिडके यांच्यावर आली होती.१२ डिसेंबर रोजी घरात कुणी नसताना सदर महिलेने ओढणीने दुपारी ३ चे सुमारास गळफास घेतला. यावेळी सून शेतात कामासाठी तर मुलगा, नातवंडे, नातेवाईकांकडे होते. सदर घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे. अन्नपूर्णाबाई घराजवळील श्रीकृष्ण मंदिरात रोज सकाळ-संध्याकाळ पूजाअर्चा करायची. घटनेची माहिती मोर्शी पोलिसांना मिळताच ठाणेदार आर. के. राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला असून, याप्रकरणी मर्ग दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.त्यांच्यामागे एक मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असाआप्त परिवार आहे. मुलगा व एक नातू यांचे नावे १० एकर शेती आहे. मुलाचे नावे सामूहिक १० एकर शेती सेंट्रल बँक आॅफ इंडियाचे ३.५० लाख कर्ज, सावकारी ५० हजार उसनवार व इतर ३ लाख, मुलाचे सततचे आजारपण, एक नातीचे विवाह कार्य, मागे मुलगा राजेंद्र (६०), २ विवाहित मुली सून व नातवंडे.

टॅग्स :Farmerशेतकरी