शेतकऱ्यांना अनुदानावर मिळणार कृषियंत्र, अवजारे
By Admin | Updated: July 24, 2016 00:09 IST2016-07-24T00:09:53+5:302016-07-24T00:09:53+5:30
राष्ट्रीय अन्न सुरषा व कृषि यांत्रिकीकरण या अभियानांतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर कृषी अवजारे व साहित्याचा लाभ देण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांना अनुदानावर मिळणार कृषियंत्र, अवजारे
दिलासा : राष्ट्रीय अन्न सुरक्षा, कृषी यांत्रिकीकरण अभियान
अमरावती : राष्ट्रीय अन्न सुरषा व कृषि यांत्रिकीकरण या अभियानांतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर कृषी अवजारे व साहित्याचा लाभ देण्यात येणार आहे. यासाठी संबंधित तालुका कृषि अधिकाऱ्यांकडे संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे.
जिल्ह्यात प्राप्त लक्षांकानुसार शेतकऱ्यांना पॉवर, नॅपसॅक स्प्रेपंप, बहुपीक पेरणी लागवड यंत्र, ट्रॅक्टरचलीत पेरणी यंत्र रोटाव्हेटर, बहुपिक पेरणी मळणी यंत्र, तुषार संच, पंपसंच, पाईप (पिव्हीसी व एचडीपीई) कल्टीव्हेटर, गादीवाफा लागवड यंत्रण, बीबीएफ यंत्र व सरी वरंबा लागवड यंत्र याचा अनुदानावर लाभ देण्यात येणार आहे. यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, महिला, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. शेतकरी लाभार्थींना महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाकडे कृषी अधिकाऱ्यांच्या पूर्वसंमतीनुसार २० दिवसाच्या आत पूर्ण रक्कम भरून खरेदी करावी लागणार आहे. देयकासह प्राप्त अहवालानुसार अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.
कृषी यांत्रिकीकरण उप अभियानांतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार व मागणीप्रमाणे शासनाने निवड केलेल्या उत्पादकांची कृषियंत्रे अनुदानावर देण्यात येतील. यामध्ये ट्रॅक्टर, औजारे, पिक संरक्षक उपकरणे, प्रक्रिया सयंत्रे, ही अनु. जाती, जमाती व अल्प, अत्यल्प भूधारक शेतकरी, महिला शेतकरी यांना किंमतीच्या ३५ टक्के किंवा जास्तीत जास्त १ लाख २५ हजार व इतर शेतकऱ्यांना २५ टक्के किंवा जास्तीत जास्त ७५ हजार ते १ लाख अनुदान देय आहे. कृषी अवजारासाठी अनु. जाती, जमाती, अल्प, अत्यल्प भूधारक शेतकरी, महिला शेतकरी यांना किंमतीच्या ५० टक्के व ईतर शेतकऱ्यांना ४० टक्के अनुदान देय आहे. (प्रतिनिधी)