समस्यांच्या सोडवणुकीसाठी कृषी सहायकांचे धरणे
By Admin | Updated: June 27, 2016 00:20 IST2016-06-27T00:20:11+5:302016-06-27T00:20:11+5:30
कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि त्या योजना राबविताना कृषी सहायकांना येणाऱ्या...

समस्यांच्या सोडवणुकीसाठी कृषी सहायकांचे धरणे
आंदोलन : जिल्हा कृषी अधीक्षकांसोबत चर्चा
चांदूररेल्वे : कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि त्या योजना राबविताना कृषी सहायकांना येणाऱ्या विविध अडचणींच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
या धरणे आंदोलनाला अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आ. बच्चू कडू यांनी भेट दिली व कृषी सहायकांच्या समस्या जाणून घेतल्या. विविध योजनांमधील निविष्ठा वाटप करताना येणाऱ्या अडचणी, फळबाग, बांधावरील वृक्षलागवड, पडिक जमिनीवरील वृक्षलागवड यामध्ये हजेरीपत्रकामुळे निर्माण होणाऱ्या अडचणींबाबत हे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. कृषी सहायकांना काम करताना अनेक अडचणी येतात. त्यावर मार्ग काढणे गरजेचे आहे. त्यासाठीच हे आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले. त्यातून निष्कर्ष निघावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)