शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला पीठ गिरणी प्रदान
By Admin | Updated: January 16, 2016 00:20 IST2016-01-16T00:20:56+5:302016-01-16T00:20:56+5:30
मकर संक्रांतीच्या पर्वावर जिल्ह्यातील चांदुरी या गावातील शेतकरी आत्महत्याग्रस्त परिवाराला उदरनिर्वाहासाठी ...

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला पीठ गिरणी प्रदान
दिलासा : युवक काँग्रेसचा उपक्रम, अमित देशमुख उपस्थित
अमरावती : मकर संक्रांतीच्या पर्वावर जिल्ह्यातील चांदुरी या गावातील शेतकरी आत्महत्याग्रस्त परिवाराला उदरनिर्वाहासाठी मल्टिपरपज पिठाची गिरणी आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते शुक्रवारी प्रदान करण्यात आली.
शेतकरी नेते व युवक काँग्रेसचे पदाधिकारी प्रकाश साबळे यांच्या प्रयत्नाने लोकवर्गणीतून हा उपक्रम राबविण्यात आला. प्रकाश नामदेवराव सांभारे या शेतकऱ्याकडे कोरडवाहू दोन एकर शेती होती. सतत नापिकी व कर्जबाजारीपणा यामुळे या शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. शासकीय मदत वगळता शासनाने अन्य कुठलीही मदत दिली नाही. ही बाब साबळे यांनी आ. देशमुख यांच्याकडे मांडली व गावकरी, काँग्रेस कार्यकर्ते यांच्या सहकार्यातून शुक्रवारी परिवाराच्या कुटुंबप्रमुख महिलेला साडीचोळी व पिठगिरणी भेट देऊन आ. अमित देशमुख यांनी परिवाराची सांत्वना केली.
यावेळी माजी आमदार वैजनाथराव शिंदे, बाळासाहेब वानखडे, मोईजभाई शेख, राजेश देशमुख, चांदुरीचे सरपंच शशीकांत गडलिंग, मिलिंद मोडक, बाबाराव सांभारे, मधुकरराव चऱ्हाटे, सुधीर गुल्हाने, अतुल इंगोले, गोपाल महल्ले, समीर जवंजाळ, एनुल्लाखान, राहुल तायडे, उमेश वाकोडे, अमोल इंगळे, राजा बागडे, शशीकांत बोंडे, अनिकेत जावरकर यांच्यासह चांदुरी गावातील नागरिक, काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)