रबीच्या सिंचनाकरिता शेतकऱ्यांची रात्रपाळी कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:31 IST2021-01-13T04:31:29+5:302021-01-13T04:31:29+5:30
अमरावती : शेतकरी नवरा हवा, अशी चित्रे समाज माध्यमांवर तरी जागतिकीकरणाशी स्पर्धा करताना त्यांच्या हालाला पारावार राहिलेला नसल्याचे स्पष्ट ...

रबीच्या सिंचनाकरिता शेतकऱ्यांची रात्रपाळी कायम
अमरावती : शेतकरी नवरा हवा, अशी चित्रे समाज माध्यमांवर तरी जागतिकीकरणाशी स्पर्धा करताना त्यांच्या हालाला पारावार राहिलेला नसल्याचे स्पष्ट आहे. दिमतीला असलेल्या लाखोंच्या जमिनीला सिंचित करून पीक काढण्यासाठी त्यांना शेतात रात्रभर राबावे लागते. शिवारात अनोळखी इसमांकडून दगाफटका, प्राण्यांचा हल्ला, वीजपुरवठ्यातील बिघाडाने मृत्यू तसेच विषारी प्राण्यांच्या दंशाची भीतीदेखील त्यांना असते. जिल्ह्यात अलीकडे अशा घटना घडल्या नसल्या तरी केव्हा, कुठली अनाहूत घटना पुढे येईल, याची शाश्वती नाही. शेतकऱ्यांना २४ तास किंवा दिवसाउजेडी वीजपुरवठा करण्याच्या राज्यकर्त्यांच्या घोषणा या घोषणाच राहिल्या आहेत.
अमरावती जिल्ह्यात कृषी चार विभागांत विभागले गेले आहे. त्यामध्ये अमरावती शहर, अमरावती ग्रामीण, अचलपूर व मोर्शी विभाग येतात. अमरावती ग्रामीण विभागात बडनेरा भातकुली, अमरावती ग्रामीण, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, तिवसा उपविभाग येतात. अचलपूर विभागात अचलपूर कॅम्प, अचलपूर शहर क्र. १, अचलपूर शहर क्र. २, अंजनगाव सुर्जी, चिखलदरा दर्यापूर, धारणी हे उपविभाग येतात. मोर्शी विभागात चांदूर बाजार, मोर्शी उपविभाग क्र. १, मोर्शी उपविभाग क्र. २, शेंदूरजनाघाट, वरूड उपविभाग क्र. १, वरूड उपविभाग क्र. २ हे उपविभाग येतात. अमरावती शहर विभागात शहर उपविभाग क्र. १, शहर उपविभाग क्र. २, शहर उपविभाग क्र. ३ हे उपविभाग येतात. या चारही विभागांमध्ये आठवड्यातील तीन दिवस दहा तास रात्री वीजपुरवठा मिळतो, तर चार दिवस आठ तास वीजपुरवठा देण्यात असल्याची माहिती आहे. रात्री होणाऱ्या दहा तासांच्या वीजपुरवठ्या कुठे रात्री ८ नंतर, तर कुठे रात्री ११ नंतर वीजपुरवठा सुरू होतो. रोहित्रावरील ताण वाढताच तो खंडित झाल्याने तेवढ्या रात्री शेतकऱ्यांनाच ओल्या अंगाने डीबीवर दुरुस्ती करायला जावे लागते. जेव्हा सारा देश झोपेच्या मिठीत असतो तेव्हा शेतकरी थंडीत कुडकुडत सिंचन
करीत असतात.
-------------------------------
रात्री वा दिवसा वीज पुरवठा करताना काही वेळा वीज खंडित होते. त्यावेळी आमच्या पातळीवर शेतकऱ्यांना खंडित कालावधीतील वीजपुरवठा करण्याचा प्रयत्न होत असतो. रबीचे पेरणीक्षेत्र वाढल्याने गत महिन्यापर्यंत खूप ताण होता. विजेची मागणीदेखील वाढली आहे.
- ज्ञानेश्वर गोरटे, प्रिंसिपल ऑपरेटर, नांदगाव खंडेश्वर
-----------
आधीच शेतात जाण्यासाठी पांदण रस्ते चांगले नाहीत. त्यात थंडीत सिंचन करावे लागते. वीजपुरवठ्यात दुरुस्ती करायची असल्यास आम्हालाच प्रयत्न करावे लागतात. सरपटणारे प्राणी पाण्यामुळे पिकात असतात. त्याकडे लक्ष ठेवूनच रात्रीचा दिवस करीत आहोत.
- ...................., गावंडे,
जानेवारी ते मार्च दरम्यान होणारा वीजपुरवठा
विभाग जानेवारी फेब्रुवारी मार्च
रात्र दिवस
अचलपूर २३.१०-९.१० ९.३५-१७.३५ २१.४०-७.४० ८.२०-१६.२० २२.४५-८.४५ ८.४५-१६.४५
अमरावती शहर २०.१५-६.१५ ८.१०-१६.१० २३.३५-९.३५ ९.३५-१७.३५ २०.५५-८.५५ ७.१५-१५.१५
अमरावती ग्रामीण २३.३५-९.३५ ९.३५-१७.३५ २०.५५-६.५५ ७.१५-१५.१५ २३.५०-९.५० ९.५०-१७.५०
मोर्शी २०.५५-६.५५ ७.५५-१५.५५ २३.५०-९.५० ९.५०-१३.५० २२.३०-८.३० ९.२०-१७.२०