शेतकऱ्यांनी एकत्र येणे काळाची गरज
By Admin | Updated: March 4, 2017 00:17 IST2017-03-04T00:17:57+5:302017-03-04T00:17:57+5:30
जिल्हा परिषद् अमरावती पशु संवर्धन विभाग व पंचायत समिती मोर्शीतर्फे भव्य पशु प्रदर्शनी व शेतकरी मेळावा सालबर्डी येथे घेण्यात आला.

शेतकऱ्यांनी एकत्र येणे काळाची गरज
वृषाली विघे : सालबर्डी येथे पशुप्रदर्शनी, शेतकरी मेळावा
मोर्शी : जिल्हा परिषद् अमरावती पशु संवर्धन विभाग व पंचायत समिती मोर्शीतर्फे भव्य पशु प्रदर्शनी व शेतकरी मेळावा सालबर्डी येथे घेण्यात आला. अध्यक्षीय भाषणातून महिला बालकल्याण सभापती वृषाली विघे यांनी शेतकऱ्यांनी एकत्र येणे काळाची गरज आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळत नसून शेतकरी कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर आहे. शेतकऱ्यांनी शेतमालाला हमीभाव मिळविण्यासाठी एकत्र येणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.
प्रदर्शनीचे उद्घाटन सतीश उईके यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष वृषाली विघे, प्रमुख अतिथी मुख्य कार्यकारी अधिकारी आभाळे, खंडारे, प्रकाश चव्हाण, पद्मा पांचाळे, रेखा सोनटक्के, वाकपांजर, नरेंद्र जिचकार उपसरपंच, प्रकाश विघे, संचालक बाजार समिती, नितीन काकडे, रुपेश वाळके, राजेंद्र पोहकार, संजय काळसकर, बापूराव गायकवाड, माया ठाकरे, प्रशांत राऊत, दिलीप मानकर, काटोले, देशमुख, सोळंके, साधना घुगे, नवरे, बोबडे, भालेराव, ईश्वर इंगळे आदी उपस्थित होते.
दुग्ध व्यवसायापासून होणाऱ्या विक्रमी उत्पादनातून शेतकऱ्यांना मदत मिळत आहे. शेतीतील उत्पन्न वाढीसाठी शेणखताच्या माध्यमातून शेंद्रय शेती करुन उत्पन्न वाढण्यास मदत होते. त्यामुळे शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून पशुपालन करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन वृषाली विघे यांनी अध्यक्षीय भाषणातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके , आभाळे, नरेंद्र जिचकार, प्रकाश विघे, दिलीप मानकर आदी मान्यवरांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
या भव्य पशु प्रदर्शनीला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची उपस्तिथी असून पशु पालकांतर्फे आपल्या पशुची नोंदणी करण्यात आली त्यावेळी विविध जातीचे शेकडो पशु या प्रदर्शनीमध्ये पाहण्यास मिळाले असून उत्कृष्ट पशु पलकांना मान्यवरांच्या हस्ते २ लक्ष्य ८० हजार रुपयांचे बक्षीस वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक पी. व्ही. सोलंके यांनी केले. संचालन राऊत यांनी केले, तर आभार प्रदर्शन राजेंद्र हूड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय भेलाऊ, सुधाकर भिवगडे, आजनकर, सारडे, वरघट यांच्यासह आदींनी अथक परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)