बाजार समितीत शेतकऱ्यांची तारांबळ

By Admin | Updated: February 12, 2015 00:19 IST2015-02-12T00:19:51+5:302015-02-12T00:19:51+5:30

मंगळवारच्या मध्यरात्री अचानक सुसाट वाऱ्यासह पावसाचे आगमन झाल्याने बाजार समितीत उघड्यावर ठेवलेला कृषिमाल वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.

Farmers' Markets in Market Committee | बाजार समितीत शेतकऱ्यांची तारांबळ

बाजार समितीत शेतकऱ्यांची तारांबळ

अमरावती : मंगळवारच्या मध्यरात्री अचानक सुसाट वाऱ्यासह पावसाचे आगमन झाल्याने बाजार समितीत उघड्यावर ठेवलेला कृषिमाल वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. काही पोते पाण्यात ओले झाल्याने नुकसानीचा सामना करावा लागला. मंगळवारी मध्य रात्री अचानक सुसाट वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. शेतकऱ्यांचा बाजार समितीत ठेवलेला कृषिमाल पावसापासून वाचविताना शेतकऱ्यांची तारांबळ उडाली होती. काही ठिकाणी ताडपत्री हवेच्या दाबामुळे उडून गेल्याने कृषिमाल ओला झाला. मात्र फारसे नुकसान झालेले नाही.
आवक घटल्याने नुकसान नाही
सध्या शेतीमालाला भाव नसल्याने बाजार समितीत मालाची आवक मागील वर्षीच्या तुलनेत फार कमी आहे. त्यामुळे काही माल गोदामात तर काही माल उघड्यावर ठेवला होता. पावसापासून मालाचा बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळेवर धावपळ केली. आवक कमी असल्याने मालाचा बचाव करण्यात काहींना यश आले. मात्र काहींचे पोते पाण्यात ओले झाले.

Web Title: Farmers' Markets in Market Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.