शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांचे मार्गदर्शक अरुण महल्ले यांची आत्महत्या, धामणगाव तालुक्यातील शेतक-यांत हळहळ  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 17:02 IST

अमरावती जिल्ह्यात शेतीतज्ज्ञ म्हणून प्रख्यात असलेले माजी सरपंच व बाजार समितीचे संचालक अरुण महल्ले (६२) यांनी रेल्वेसमोर उडी घेऊन सोमवारी सायंकाळी आत्महत्या केली.

अमरावती - अमरावती जिल्ह्यात शेतीतज्ज्ञ म्हणून प्रख्यात असलेले माजी सरपंच व बाजार समितीचे संचालक अरुण महल्ले (६२) यांनी रेल्वेसमोर उडी घेऊन सोमवारी सायंकाळी आत्महत्या केली. त्यांच्यावर तीन लाखांचे कर्ज होते. अरुण महल्ले यांनी १५ एकर शेतावर तीन लाखांचे कर्ज घेतले होते. कर्जमाफीचा आॅनलाईन अर्जही त्यांनी भरला होता. यंदा कमी पाऊस व उत्पादन कमी होणार यांची त्यांना जाणीव झाली होती. यामुळे आपण जीवन संपवू शकतो, असे त्यांनी पत्नी चंदा यांना मृत्यूपूर्व सांगितले होते. सोमवारी सायंकाळी धामणगाव रेल्वे स्थानकाच्या पूर्व दिशेला अमरावती- जबलपूर रेल्वेगाडी येत असताना त्यासमोर उडी घेऊन आत्महत्या केली. एका विचारवंत शेतक-याने आत्महत्येसारखे पाऊल उचलल्यामुळे धामणगाव तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. कर्जामुळेच त्यांनी हे पाऊल उचलले असे त्यांचे पुतणे सचिन महल्ले यांनी सांगितले. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी रात्री ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. अरुण महल्ले हे शेतीसंदर्भातील सखोल माहिती ठेवणारे तज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. ते स्वत:च शेती करीत असल्यामुळे पेरणी, फवारणी, डवरणी, निंदण यासर्व बाबींची माहिती देऊन शेतक-यांना किती फायदा होऊ शकतो, याची आकडेवारीसह मार्गदर्शन करीत होते. त्यांनी दिघी (महल्ले) ग्रामपंचायतीचे १० वर्षे सरपंचपद सांभाळले. यासोबतच शेतक-यांचे प्रतिनिधी म्हणून धामणगाव बाजार समितीमध्ये संचालक होते.

टॅग्स :Suicideआत्महत्याFarmerशेतकरी