शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी, भावाअभावी कापूस पडून
By Admin | Updated: November 16, 2014 22:42 IST2014-11-16T22:42:34+5:302014-11-16T22:42:34+5:30
आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात मंदी आहे. मागणी अभावी निर्यात ठप्प आहे, सरकीचे दर देखील गडगडले आहेत. एकंदर कापूस उत्पादन ‘घाटे का सौदा’ ठरत आहे. ‘अच्छे दिन’ची प्रतीक्षा

शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी, भावाअभावी कापूस पडून
अमरावती : आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात मंदी आहे. मागणी अभावी निर्यात ठप्प आहे, सरकीचे दर देखील गडगडले आहेत. एकंदर कापूस उत्पादन ‘घाटे का सौदा’ ठरत आहे. ‘अच्छे दिन’ची प्रतीक्षा करणारा शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. भावाअभावी कापूस घरी पडून आहे. घरात पडून असलेल्या कापसाचे वजन देखील कमी होत चालले आहे.
व्यापारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्यावर्षी चीन, पाकिस्तान, अमेरिका व आस्ट्रेलिया येथे कापसाच्या बाजारात तेजी असल्याने भारतामधून १ कोटी ३० लाखांवर कापसाच्या गाठी निर्यात झाल्या होत्या. त्यामुळे कापसाला ४५०० ते ४८०० पर्यंत भाव मिळाला होता. अमेरिका, चीन, आॅस्ट्रेलिया, बेल्जीयम व पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला मागणी नाही. भारतापेक्षाही तेथील कापूस बाजार भावात मंदीचे सावट आहे. त्यामुळे कापूस उत्पादकांचा उत्पादन खर्च निघणेही कठिण आहे.