शेतकऱ्यांच्या तुरीला फुटले पाय!
By Admin | Updated: March 11, 2016 00:30 IST2016-03-11T00:30:11+5:302016-03-11T00:30:11+5:30
निसर्गाच्या वादळी मारातून वाचलेले शेतकऱ्यांचे पीक कसे बसे घरी येत असताना काही तरी दिलासा मिळेल,

शेतकऱ्यांच्या तुरीला फुटले पाय!
चोरट्यांचा उच्छाद : भीतीचे वातावरण
प्रशांत काळबेंडे जरुड
निसर्गाच्या वादळी मारातून वाचलेले शेतकऱ्यांचे पीक कसे बसे घरी येत असताना काही तरी दिलासा मिळेल, या आशेवर शेतकरी असताना तेच पीक घरून चोरी जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.
प्राप्त माहिती नुसार, जरुड येथील अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत आपला शेती व्यवसाय करणारे योगेश गणपतराव दारोकर यांनी आपल्या २ एक्कर शेतीत पेरलेल्या तुरीचे उत्पादन अत्यंत कमी झाले त्यात झालेल्या ३ क्विंटल तुरी आपल्या घरी आणून ठेवल्या असता काही कामानिमित्त योगेश दारोकर बाहेर गावाला निघून गेले. घर बंद असल्याचे पाहून चोरट्याने डाव साधला आणि दु-चाकीवर त्या तुरी चोरून लंपास केले. परंतु चोरांच्या दुर्दैवाने तुरीचे एक पोते थोडे फाटले असल्याने त्यातील तुरी रस्त्याने सांडत जाऊन मंगरुळी रस्त्या लगत असलेल्या बाबाराव ब्राम्हाने यांच्या घरापर्यंत मार्ग सापडला.
पोलिसांनी व नागरिकांनी सदर तुरीचा मुद्दे माल बंद असलेल्या ब्राम्हणे यांच्या घरातून हस्तगत परिसरात सदर तुरी कोणी चोरून नेल्या त्या बंद असलेल्या ब्राम्हणे यांच्या घरापर्यंत कशा पोहोचल्या, घराजवळ मिळालेल्या दु- चाकीच्या चाकांचे निशाण कोणाच्या गाडीचे ? चोरी करणारे किती जण होतेत ? या चचेर्ने परिसरात उधाण आले असून पोलिसांनी भादंवीच्या ४५७ व ३८० कलम अन्वये गुन्हा नोंदविला असून घर मालक बाबाराव ब्राम्हणे यांना अटक करण्यात आली आहे.