सावकारांकडून शेतकऱ्यांना वाटले ४३ कोटींचे कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:36 IST2021-01-08T04:36:31+5:302021-01-08T04:36:31+5:30

(असाईनमेंट) अमरावती : जिल्ह्यात ५७२ परवानाधारक सावकार आहेत. त्याच्याद्वारा डिसेंबरपर्यंत ९६,५२५ शेतकऱ्यांना ४२ कोटी ७७ लाख ८३ हजार रुपयांचे ...

Farmers feel debt of Rs 43 crore from moneylenders | सावकारांकडून शेतकऱ्यांना वाटले ४३ कोटींचे कर्ज

सावकारांकडून शेतकऱ्यांना वाटले ४३ कोटींचे कर्ज

(असाईनमेंट)

अमरावती : जिल्ह्यात ५७२ परवानाधारक सावकार आहेत. त्याच्याद्वारा डिसेंबरपर्यंत ९६,५२५ शेतकऱ्यांना ४२ कोटी ७७ लाख ८३ हजार रुपयांचे बिगर कृषीकर्ज वाटप करण्यात आल्याची माहिती सहकार विभागाने दिली.

जिल्ह्यात परवानाधारक सावकारांकडून एकाही शेतकऱ्याला कृषी कर्ज देण्यात आलेले नाही, हे येथे उल्लेखनीय. याशिवाय ९५ हजार १८५ शेतकऱ्यांना ३८ कोटी २६ लाख १६ हजारांचे तारण कर्ज वाटण्यात आले व १३४० शेतकऱ्यांना ४ कोटी ५१ लाख ६७ हजारांचे बिगर तारण कर्ज वाटप करण्यात आलेले आहे. असे एकूण ९६ हजार ५२५ शेतकऱ्यांना ४२ कोटी ७७ लाख ८३ हजार रुपयांचे कर्ज वाटण्यात आलेले आहे.

जिल्ह्यात परवानाधारक सावकारांपेक्षा अवैध सावकारांनी वाटलेल्या कर्ज हे कित्येक पटींनी अधिक आहे. महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ मधील कलम १६ अन्वये आतापर्यंत जिल्ह्यात २७५ प्रकरणे दाखल करण्यात आलेली आहेत. यापैकी २३६ प्रकरणांत कलम १६ अन्वये अभिलेख/ दस्तऐवज तपासणी केलेल्या अर्जांची संख्या २३६ आहे. ३९ प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत. यापैकी २०४ प्रकरणांत सहकार विभागात तत्थ आढळले नाही. याशिवाय ३२ प्रकरणातील व्यक्ती अवैध सावकारीचा व्यवसाय करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. यापैकी २१ प्रकरणांत २९ व्यक्तींविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात आल्याची माहिती सहकार अधिकारी सुधीर मानकर यांनी दिली.

पाईंटर

जिल्ह्यातील परवानाधारक सावकार : ५७२

शेतकऱ्यांनी गेल्या वर्षभरात मृत्यूला कवटाळले: २८०

बॉक्स

वर्षभरात २८० शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूला

जिल्ह्यात सन २०२० या वर्षात २८० शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. यामध्ये सावकारी कर्ज, तगादा हेदेखील एक कारण समोर आले आहे. यात जानेवारी महिन्यात २४, फेब्रुवारी २७, मार्च १४, एप्रिल १३, मे २९, जून २९, जुलै ३१. ऑगस्ट २५, सप्टेंबर ३०, ऑक्टोबर २५, नोव्हेंबर २१ व डिंसेबर महिन्यात १२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत.

बॉक्स

अधिकृत सावकारांची व्याजदर आकारणी

परवानाधारक सावकारांकडून तारण कृषी कर्ज घेतल्यास वर्षाला ९ टक्के, बिगर तारणसाठी १२ टक्के, बिगर कृषी तारण कर्जासाठी १५ टक्के, आणि बिगर कृषी बिगर तारणासाठी १८ टक्के व्याजदर आकारला जातो.

बॉक्स

अनधिकृत सावकारी बोकाळली

जिल्ह्यात दोन हजारांवर अनधिकृत व्यक्ती सावकारीचा व्यवसाय करीत आहे. सहकार विभागाद्वारा आतापर्यंत १६.२७ हेक्टर जमिन सावकारी पाशातून सोडविण्यात आलेली आहे. २१ प्रकरणांत २९ अवैध सावकारांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकारातील २७५ अर्ज सहकार विभागाकडे दाखल करण्यात आले होते.

बॉख्स

तालुकानिहाय शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज

अमरावती : २७,४८९

भातकुली : १,९१८

मोर्शी : १,९०७

अंजनगाव सुर्जी : २६४

धामणगाव रेल्वे : २,८१६

वरुड : १,३३४

अचलपूर : ५०,१२५

धारणी : ३१९

नांदगाव खंडेश्वर : २४२

चांदूर रेल्वे : ३,८०८

चांदूर बाजार : १,३३४

तिवसा : १,८६२

दर्यापूर : ३,१०७

Web Title: Farmers feel debt of Rs 43 crore from moneylenders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.