कृषकांनी माती टाकून विझविली ‘डीबी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 22:43 IST2019-03-12T22:43:29+5:302019-03-12T22:43:55+5:30
नजीकच्या सावळी दातुरा येथील एका शेतातील डीबीने सोमवारी दुपारी १२ वाजता पेट घेतला. तथापि, शेतकरी व रस्त्याने ये-जा करणाऱ्यांनी माती टाकून ती आग विझविली.

कृषकांनी माती टाकून विझविली ‘डीबी’
परतवाडा : नजीकच्या सावळी दातुरा येथील एका शेतातील डीबीने सोमवारी दुपारी १२ वाजता पेट घेतला. तथापि, शेतकरी व रस्त्याने ये-जा करणाऱ्यांनी माती टाकून ती आग विझविली.
सावळी दातुरा येथील खेल देवमाळी परिसरात सुंदरलाल नावाने ओळखली जाणारी डीबी असून, ती सतत नादुरुस्त राहते. यासंदर्भात अचलपूर येथील महावितरण कार्यालयाला अनेकदा तक्रारी करूनही कुठल्याच प्रकारची दुरुस्ती केली जात नसल्याची तक्रार शेतकरी विजय प्रजापती यांनी केली आहे. नादुरुस्त डीबीमुळे शेतकऱ्यांचा जीव धोक्यात आला आहे. सोमवारी डीबीने अचानक पेट घेतला असता, विजय प्रजापती यांच्यासह नंदवंशी टिकम, टीकम शेठ, बबूभाई, मतीनभाई, युसूफभाई, प्रदीप पाटील, रमेश प्रजापती, कुरडकर, प्यारेलाल प्रजापती आदी शेतकऱ्यांनी माती टाकून आग नियंत्रणात आणली. यामुळे मोठा अनर्थ टळला.