शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नाफेड विक्रीसाठी शेतकरी वंचित; खरेदी-विक्री संघावर कारवाईची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 14:11 IST

Amravati : अनेकांनी सोयाबीन विक्रीला कागदपत्रे खरेदी-विक्री संस्थेकडे जमा केली होती

सुमित हरकुट लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्रीसाठी आवश्यक कागदपत्रे चांदूर बाजार खरेदी-विक्री संस्थेकडे जमा केली होती. मात्र, ही कागदपत्रे वेळेत ऑनलाइन करण्यात आली नाहीत. परिणामी, शेतकऱ्यांना बाजारभाव मिळण्यापासून वंचित राहावे लागले. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी संस्थेवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

खरेदी-विक्री संस्थेकडून नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदी करण्यात येत आहे. यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने आवारात जागा उपलब्ध केली. यासाठी तालुक्यातील रसुल्लापूर येथील शेतकरी अश्विन भेटाळू, नितीन भेटाळू व लीलाबाई भेटाळू यांनी १७ डिसेंबर २०२४ रोजी खरेदी-विक्री संस्थेकडे सर्व कागदपत्रे जमा केली होती. त्यांचा अनुक्रमे ८४७, ८४८, ८४९ असून, खरेदी-विक्री संस्थेने त्यांच्या पुढील शेतकऱ्यांचे ऑनलाइन करून माल खरेदी सुद्धा केला. याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी सहकार राज्यमंत्री, जिल्हा निबंधक कार्यालय व सहायक निबंधक कार्यालयात तक्रार दाखल केली. याप्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केले. १७ डिसेंबर २०२४ मध्ये खरेदी-विक्री संस्थेकडे सर्व कागदपत्रे जमा केली होती. परंतू संस्थेनी ऑनलाइन केल्याचा आरोप आहे.

कापसासारखेच ठेवावे लागणार का साठवून?शेतकऱ्यांच्या कपाशीला फेब्रुवारी महिना लागला तरी हे पीक घरातच पडून आहे. जास्त दिवस झाल्याने आता अंग खाजवायला सुरुवात झाली आहे. सोयाबीनचेही तेच होणार का, असा प्रश्न विचारला जात आहे. सुरुवातीच्या काळामध्ये पिकाला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या घरातच सोयाबीन ठेवले होते. शासकीय खरेदी सुरू झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपल्या घरातील सोयाबीन हे विक्रीस काढले. परंतु नोंदणी होऊनही काहींना ते मुदतीत विकता आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मार्केटमध्ये भाव नाही, नाफेडचे पोर्टल बंद झाले आहे. त्यामुळे घरातील सोयाबीनचे काय करावे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

शेतकऱ्यांचे क्विंटलमागे हजार रुपयांचे नुकसानसरकारी हमीभाव सोयाबीनसाठी ४,५०० ते ५,००० रुपये प्रतिक्विंटल निश्चित करण्यात आला होता. मात्र, संस्थेच्या दिरंगाईमुळे अनेक शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना केवळ ३,५०० ते ४,००० रुपये दराने सोयाबीन विक्री करावी लागली. यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. यामध्ये उत्पादन खर्चही पदरी पडत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली.

३०० शेतकरी वंचितस्थानिक खरेदी-विक्री संस्थेत नाफेड खरेदीची अंतिम तारीख ६ फेब्रुवारी रोजी संपली. जवळजवळ ३०० शेतकऱ्यांची नोंदणी झाली नसल्याची माहिती आहे

टॅग्स :Amravatiअमरावती