पीक विम्यातून शेतकऱ्यांच्या कर्जाची कपात
By Admin | Updated: July 10, 2016 00:04 IST2016-07-10T00:04:16+5:302016-07-10T00:04:16+5:30
तालुक्यांतर्गत मांजरी म्हसला येथील बँक आॅफ बडोदा शाखेत पीक विम्याच्या रकमेतून शेतकऱ्यांच्या कर्जाची कपात होत असल्याची माहिती मिळताच...

पीक विम्यातून शेतकऱ्यांच्या कर्जाची कपात
मांजरी म्हसला येथील प्रकार : व्यवस्थापकाला युवा सेनेचा घेराव
नांदगाव खंडेश्वर : तालुक्यांतर्गत मांजरी म्हसला येथील बँक आॅफ बडोदा शाखेत पीक विम्याच्या रकमेतून शेतकऱ्यांच्या कर्जाची कपात होत असल्याची माहिती मिळताच युवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात बँक व्यवस्थापकाला शुक्रवारी घेराव घालण्यात आला.
सध्या शेतकरी हलाकीच्या परिस्थितीत आहे. शासनाकडून जी पीक विम्याची रक्कम मिळेल त्यामधून शेतातील इतर कामाला हातभार लागेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांची होती. परंतु शेतकऱ्यांना मिळणारी पीक विमा रक्कम बँक व्यवस्थापक कर्जात कपात करीत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. याची दखल घेत युवा सेनेने बँक व्यवस्थापकाला घेराव घातला. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. यावेळी युवा सेनेचे प्रकाश मारोटकर, शिवानी मेश्राम, मनदेव चव्हाण, सागर सोनोने, ब्रम्हानंद शामसुंदर, योगेश झिमटे, चेतन केवळ, अभय बनारस आदींची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)