शेतकरी एकता पॅनेलचा मेळावा
By Admin | Updated: September 11, 2015 00:36 IST2015-09-11T00:36:06+5:302015-09-11T00:36:06+5:30
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शेतकरी एकता पॅनेलचा निर्धार मेळावा स्थानिक शुभम् मंगलम कार्यालय दसरा मैदान बडनेरा रोड येथे गुरुवारी संपन्न झाला.

शेतकरी एकता पॅनेलचा मेळावा
एक रुपयात जेवण : शेतमाल सुरक्षा गृहनिर्मितीचा संकल्प
अमरावती : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शेतकरी एकता पॅनेलचा निर्धार मेळावा स्थानिक शुभम् मंगलम कार्यालय दसरा मैदान बडनेरा रोड येथे गुरुवारी संपन्न झाला.
पॅनेलचे निमंत्रक आ. रवी राणा, माजी खासदार अनंत गुढे, भाजप शहर अध्यक्ष तुषार भारतीय, सरपंच संघटनेचे अध्यक्ष गजानन बोंडे, प्रहार जिल्हाध्यक्ष छोटू महाराज वसू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमित अढाऊ, नितीन हटवार, नरेंद्र निर्मळ, राष्ट्रवादी कार्याध्यक्ष अनिल ठाकरे, निंबाळकर, सुनील राणा, श्रीकांत राठी आदी मंचावर उपस्थित होते. संचालन युवा स्वाभिमान जिल्हाध्यक्ष जितू दुधाणे यांनी केले. प्रास्ताविक संजय इंगोले यांनी केले.
तुषार भारतीय यांनी बाजार समितीतील भ्रष्टाचार दूर करून स्वच्छ प्रशासनासाठी हे पॅनेल कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केले. सरपंच संघटनेचे अध्यक्ष गजानन बोंडे यांनी संपूर्ण सरपंच संघटना या पॅनेलच्या पाठिशी उभे असल्याचे सांगितले. अनंत गुढे यांनी बाजार समितीत झालेल्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्याचा मानस व्यक्त केला.
आ. राणा यांनी सर्वप्रथम बाजार समितीची दुरवस्था व दुर्दशा दूर करण्यासाठी पॅनेलसोबत असल्याचे सांगितले. घराणेशाहीच्या विरोधात आपण असून त्यामुळे सुनील राणा यांची उमेदवारी मागे घेतल्याचे सांगितले. जर उमेदवारांनी निवडून आल्यानंतर बाजार समितीच्या विकासाविरुद्ध किंवा शेतकरी हिताविरूद्ध कृती केली तर अशा सदस्यांना तत्काळ बरखास्त करू, यासाठी सर्व उमेदवारांचे राजीनामे आधीच घेतल्याचे सांगितले.
केंद्र सरकार, राज्य सरकार, मुख्यमंत्री यांचे माध्यमातून भरीव निधी आणून बडनेरा उपबाजार समिती, गुरे बाजार, भातकुली उपबाजार समितीची निर्मिती व अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचा सर्वांगिण विकास करण्याचे वचन दिले. कार्यक्रमाची सुरूवात काळ्या मातीची पूजा करून महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व वयोवृद्ध शेतकऱ्यांचा सत्काराने झाली.
आभार प्रदर्शन श्रीकांत राठी यांनी केले. कार्यक्रमात नितीन हटवार, नरेंद्र निर्मळ, अजिज पटेल, पं. स. सभापती संगीता चुनकीकर, ललीत समदुरकर, मधुकर जाधव, विनोद जायलवाल, विनोद गुहे, संजय चुनकिकर, सुनील निचत, विजय पोकळे, ज्योती सैरीसे, उमेदवार मनोज अर्मळ, संजय इंगोले, प्रताप भुयार, संजय गोमे, अरविंद मेहरे, मधुकर रोडगे, शंकर लेंडे, साधना पाथरे, रेखा बारबुद्धे, संतोष महात्मे, नीलेश मानकर, रामदास रहाटे, मनोज लोखंडे, मिलिंद तायडे यांच्यासह राजू रोडगे, राजू हरणे, बाळू जवंजाळ, विजय पोकळे, जगदीश अंबाडकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)