शेतकरी आक्रमक

By Admin | Updated: May 15, 2015 00:03 IST2015-05-15T00:03:23+5:302015-05-15T00:03:23+5:30

केंद्र शासनाने भूमी अधिग्रहणाचा वटहुकूम काढला आहे. यामुळे शहराच्या अंतर्गत व जवळपासच्या बाजारपेठांमध्ये ज्या जागांच्या किमती वाढत आहेत

Farmer aggressive | शेतकरी आक्रमक

शेतकरी आक्रमक

भूमिअधिग्रहण वटहुकूमाच्या निषेधार्थ भाकपचा 'रस्ता रोको'
गजानन मोहोड अमरावती
केंद्र शासनाने भूमी अधिग्रहणाचा वटहुकूम काढला आहे. यामुळे शहराच्या अंतर्गत व जवळपासच्या बाजारपेठांमध्ये ज्या जागांच्या किमती वाढत आहेत अशा जागा कवडीमोल किमतीने उद्योगपती हडपण्याची शक्यता आहे. भारतीय कॅम्युनिस्ट पक्षाचा याला विरोध आहे.
यासाठी देशव्यापी रास्तारोकोची हाक देण्यात आली. याचाच एक भाग म्हणून शहरातून गुरुवारी सकाळी १२ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर रहाटगावनजीक 'रास्ता रोको' आंदोेलन करण्यात आले.
यापूर्वीचा १८९४ मधील जमीन अधिग्रहण कायदा बदलविण्यासाठी मोदी सरकार आकाश-पाताळ एक करीत आहे. यानंतर २०१३ चा कायदा दूर सारत केंद्र सरकारने या कायद्यात अध्यादेश काढून अनेक बाबी वगळल्यात. शासनाने ही जबाबदारी खासगी क्षेत्राकडे दिली आहेत. आता ग्रामसभा व जमीन मालक यांच्या संमतीची गरज अध्यादेशात ठेवली नाही. याचा निषेध करीत भाकपाच्या पदाधिकाऱ्यांनी १० मिनिटांपर्यंत राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. या आंदोलनात जे.एस. कोठारी, डी.के. जाधव, शरद मंगळे, निर्मला ढोके, गजानन दहीकर, एन.बी. कडू, गजानन कडू, बोके, मुख्त्यार बनसोड, सुरेश टपके, आनंद गोळे, आशिष शिरसाट, ज्ञानेश्वर जुनघरे आदी सहभागी झाले होते.
आंदोलनकर्त्यांना गाडगेनगर पोलिसांनी अटक करुन सुटका केली.

Web Title: Farmer aggressive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.