मावळत्या वर्षाला निरोप, नववर्षाच्या स्वागतासाठी नंदनवन सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:13 IST2020-12-31T04:13:53+5:302020-12-31T04:13:53+5:30
चिखलदरा नरेंद्र जावरे लोकमत न्यूज नेटवर्क विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळ २०२० या मावळत्या वर्षाला निरोप देण्याचे २०२१ ...

मावळत्या वर्षाला निरोप, नववर्षाच्या स्वागतासाठी नंदनवन सज्ज
चिखलदरा नरेंद्र जावरे
लोकमत न्यूज नेटवर्क
विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळ २०२० या मावळत्या वर्षाला निरोप देण्याचे २०२१ या नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज आहे राज्य शासनाने सुद्धा थर्टी फर्स्टसाठी विशेष आदेश जारी केले असून पर्यटन स्थळावरील नियमांचे पालन पर्यटकांना करावे लागणार आहे त्यावर प्रशासनाची नजर राहणार आहे
दरवर्षी हजारोंच्या संख्येने चिखलदरा पर्यटन स्थळावर मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नववर्षाच्या स्वागतासाठी हजारो पर्यटक हजेरी लावतात त्यासाठी येथील हॉटेल व्यवसाय पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे तर दुसरीकडे कोरोनाचा उद्रेक पाहता सर्व ठिकाणी काटेकोर नियमांचे पालन करण्याचे आदेश राज्य शासनाच्यावतीने प्रशासनाला देण्यात आले आहे दिनांक २१ डिसेंबर,२०२० राज्यात दिनांक २२ डिसेंबर, २०२० ते ५ जानेवारी, २०२१ या कालावधीत रात्री ११.०० ते सकाळी ६.०० वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
कोविड- १९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता त्याचप्रमाणे वरील आदेशान्वये दिलेल्या सूचना विचारात घेता ३१ डिसेंबर. २०२० व नूतन वर्षाचे स्वागत अत्यंत साधेपणाने करणे अपेक्षित आहे.
बॉक्स
या नियमांचे करावे लागेल पालन
कोरोनाच्या अनुषंगाने दि. ३१ डिसेंबर, २०२० रोजी दिवसभर संचारबंदी नसली तरी देखील सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व दि. १ जानेवारी, २०२१ रोजी नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने करावे. ३१ डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी समुद्र किनारी, बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंग (सामाजिक अंतर) राहील तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे कोरोना च्या पार्श्वभूमीवर ६० वर्षावरील नागरिकांनी व दहा वर्षांखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे. नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक/सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करू नये तसेच मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. तसेच संबंधितांनी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात. फटाक्यांची आतषबाजी करण्यात येऊ नये, ध्वनिप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे.
कोविड-१९ या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे.
लागणार आहे राज्य शासनाच्यावतीने गृह विभागाचे उपसचिव संजय खेडेकर यांनी एक परिपत्रक काढले आहे
बॉक्स
चिखलदऱ्यात पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त
कुळ पर्यटन स्थळावर मावळत्या वर्षाला निरोप देताना व नववर्षाच्या स्वागतासाठी दारू पिऊन धुमाकूळ घालणाऱ्या पर्यटकांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे तर कोविडं नियमांचे पालन पर्यटकांना करावे लागणार आहे त्यासाठी महसूल नगरपालिका प्रशासन लक्ष ठेवून आहे चिखलदरा पर्यटन स्थळावर वाहतूक व इतर पोलीस कर्मचाऱ्यांचा अतिरिक्त बंदोबस्त लावण्यात आला असल्याची माहिती ठाणेदार आकाश शिंदे यांनी दिली
बॉक्स
नऊ लाखाचा महसूल, पर्यटकांची गर्दी
नाताळ दरम्यान चिखलदरा पर्यटन स्थळावर हजारो पर्यटकांनी गर्दी केली होती त्यातूनच चिखलदरा नगरपालिकेला मागील तीन महिन्यात ९ लक्ष रुपयांचा महसूल मिळाला आहे तर आठवड्यात एका दिवसात सव्वा लक्ष रुपये पर्यटन करापासून पालिकेला प्राप्त झाले
कोट
कोविड नियमानुसार पर्यटकांना मावळत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागत करावे लागणार आहे दारू पिऊन धुमाकूळ घालणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल यासाठी पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे
आकाश शिंदे
ठाणेदार चिखलदरा