‘ती’ दुकाने पूर्ववत लावण्याची मुभा
By Admin | Updated: July 9, 2016 00:03 IST2016-07-09T00:03:10+5:302016-07-09T00:03:10+5:30
दस्तुरनगर चौकालगतच्या जागेवर पुन्हा शिस्तीत दुकाने लावण्याची सूचना महापालिका आयुक्त हेमंत पवार यांनी केली.

‘ती’ दुकाने पूर्ववत लावण्याची मुभा
अमरावती : दस्तुरनगर चौकालगतच्या जागेवर पुन्हा शिस्तीत दुकाने लावण्याची सूचना महापालिका आयुक्त हेमंत पवार यांनी केली. आ. राणा यांच्यासह शुक्रवारी दुपारी या जागेची पाहणी केल्यानंतर वाहतुकीस अडथळा न होवू देता कार्डधारकांनी दुकाने लावण्यास हरकत नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. आ. रवी राणा यांच्यासह भरपावसात फेरीवाले अत्यंत आक्रमक झाले होते. गुरूवारी अतिक्रमण हटविल्यानंतर ते पुन्हा पूर्ववत करण्याची सूचना आ. राणा यांच्या मध्यस्तीनंतर पवारांना द्यावी लागली.
शुक्रवारी दुपारी युवा स्वाभिमान संघटनेच्या नेतृत्वात फेरीवाल्यांचा मोर्चा महापालिकेत धडकला होता. त्यावेळी फेरीवाल्यांना शांत करीत दुपारी या भागाची आपण स्पॉट व्हिजिट करू, असे आयुक्तांनी सांगितले होते. त्यानुसार दुपारी २ च्या सुमारास आयुक्त हेमंत पवार यांनी दस्तुरनगरमधील या शेतमाल खरेदी विक्री केंद्राची पाहणी केली. शेतकऱ्यांना त्यांचा माल थेट ग्राहकांना विकता यावा, यासाठी तत्कालिन पालकमंत्र्यांच्या निर्देशांनी या ठिकाणी शेतकऱ्यांना व्यवसाय करण्यास जागा देण्यात आली, असे आ. रवी राणा यांनी आयुक्तांच्या लक्षात आणून दिले. महापालिकेनेच ही जागा त्यांच्यासाठी आरक्षित केली असताना पालिकेने बुलडोझर चालविलाच कसा?
गद्रे चौकातील सौंदर्यीकरण हटणार
अमरावती : पावसाळ्यात अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली जाते का, असा सवाल उपस्थित केला. नझुलच्या या जागेवर शेतकऱ्यांऐवजी अन्य काहींनी अतिक्रमण केल्याची माहिती पोलिसांना मिळाली व त्यावरुन ते अतिक्रमण काढण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. राणांच्या मध्यस्थीनंतर कार्डधारक शेतकऱ्यांनी या ठिकाणी पुन्हा दुकाने लावण्यास हरकत नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. वाहतुकीस अडथळा ठरणारे गद्रे चौकामधील दोन्ही सौंदर्यीकरण काढण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.