करबुडव्या सन्मित्र नागरी पतसंस्थेला ठोकले सील

By Admin | Updated: March 11, 2015 00:26 IST2015-03-11T00:26:30+5:302015-03-11T00:26:30+5:30

येथील सन्मित्र नागरी सहकारी पतसंस्थेने महानगरपालिकेचा मालमत्ता कर न भरल्यामुळे या संस्थेला सील ठोकण्यात आले.

False seal for the taxpayer Sanmitar civil credit society | करबुडव्या सन्मित्र नागरी पतसंस्थेला ठोकले सील

करबुडव्या सन्मित्र नागरी पतसंस्थेला ठोकले सील

बडनेरा : येथील सन्मित्र नागरी सहकारी पतसंस्थेने महानगरपालिकेचा मालमत्ता कर न भरल्यामुळे या संस्थेला सील ठोकण्यात आले. इतर ठिकाणी एकाच दिवशी राबविलेल्या धडक मोहिमेतून ३ लाख ३४ हजार रुपयांचा मालमत्ता कर वसुल करण्यात आला असल्याची माहिती महापालिकेचे सहाय्यक आयुक्त योगेश पिठे यांनी दिली.
आठवडी बाजारस्थित सन्मित्र नागरी सहकारी पतसंस्थेकडे २००५-०६ वर्षीपासून ३२ हजार रुपयांचा मालमत्ता कर थकीत होता. मनपाने थकित कराचा भरणा तत्काळ करावा, अशी नोटीेस पतसंस्थेला दिली होती. मात्र, थकित कराचा भरणा न केल्यामुळे ९ मार्च रोजी मनपाचे सहाय्यक आयुक्त योगेश पीठे यांच्या नेतृत्वातील पथकाने सन्मित्र नागरी सहकारी पतसंस्थेला सील ठोकले. त्याचप्रमाणे इतरही ठिकाणी थकित असणाऱ्या मालमत्ता करापोटी ३ लाख ३४ हजार रुपयांचा कर या पथकाने एकाच दिवशी वसुल केलेला आहे. बडनेऱ्यातील मनपाच्या दक्षिण झोन कार्यालयाला ८ कोटी ७५ लाख रुपयांचे मालमत्ता कर वसुलीचे टार्गेट आहे. यापैकी ६ कोटींच्या वर मालमत्ता कर वसुल झालेला आहे. या कारवाईत सहायक आयुक्त योगेश पीठे, क्षेत्रिय अधिकारी मंगेश वाटाणे, संतोष येलगुंडे, कर निरीक्षक आर. एस. देशमुख, श्रीवास्तव, स्वास्थ निरीक्षक एकनाथ कुळकर्णी, वसुली लिपिक पाल यांच्यासह इतरही मनपाचे कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: False seal for the taxpayer Sanmitar civil credit society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.