खोट्या इन्शुरन्स क्लेमशी संबंध नाही, बदनामी थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:22 IST2021-02-28T04:22:51+5:302021-02-28T04:22:51+5:30
परतवाडा : रॅपिड अॅन्टिजेन टेस्ट करण्याची परवानगी रद्द करण्याचा संबंध खोटे इन्शुरन्स क्लेम प्रकरणाशी जोडून समाजमाध्यमांवर व्हॉट्सअॅपद्वारे खोट्या ...

खोट्या इन्शुरन्स क्लेमशी संबंध नाही, बदनामी थांबवा
परतवाडा : रॅपिड अॅन्टिजेन टेस्ट करण्याची परवानगी रद्द करण्याचा संबंध खोटे इन्शुरन्स क्लेम प्रकरणाशी जोडून समाजमाध्यमांवर व्हॉट्सअॅपद्वारे खोट्या अफवा पसरविला जात असल्याच्या कारणांवरून शहरातील खासगी पॅथॉलॉजी लॅब संचालक व डॉक्टरांनी अचलपूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदन दिले.
परतवाड्यात कोणतेही खासगी कोविड हॉस्पिटल नाही. त्यामुळे खोट्या रिपोर्टद्वारे इन्शुरन्स क्लेम करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. रॅपिड अॅन्टिजेन टेस्ट वगळता आमच्या पॅथॉलॉजी लॅबचे नियमित कामकाज सुरू आहे. खोटे रिपोर्ट दिले नाहीत. सोबतच या प्रकरणाशी संबंध नसतानाही लॅब संचालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे डॉ. ओमप्रकाश बोहरा, डॉ. खुशबू बरडिया, डॉ.भाविका चंदनानी यांनी म्हटले आहे. आयएमएचे पदाधिकारी डॉ. नितीन मानकर यांच्या उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले.