पालकमंत्र्यांनी केले शासकीय समारंभात ध्वजारोहण

By Admin | Updated: January 28, 2016 00:19 IST2016-01-28T00:19:37+5:302016-01-28T00:19:37+5:30

भारतीय प्रजासत्ताकाचा ६६ वा वर्धापन दिन समारंभ अमरावतीमध्ये जवाहरलाल नेहरु स्टेडियम येथे उत्साहात साजरा झाला.

False hoisting at the official ceremony of Guardian Minister | पालकमंत्र्यांनी केले शासकीय समारंभात ध्वजारोहण

पालकमंत्र्यांनी केले शासकीय समारंभात ध्वजारोहण

मानवंदना : विभागीय क्रीडा संकुलात कार्यक्रम
अमरावती : भारतीय प्रजासत्ताकाचा ६६ वा वर्धापन दिन समारंभ अमरावतीमध्ये जवाहरलाल नेहरु स्टेडियम येथे उत्साहात साजरा झाला. पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते मुख्य शासकीय समारंभात सकाळी ९ वाजता ध्वजारोहण झाले.
यावेळी स्वातंत्र्य संग्राम सैनिक, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, विशेष पोलीस महानिरीक्षक संजीवकुमार सिंघल, पोलीस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक, राज्य राखीव पोलीस बलाचे समादेशक जी.बी.डाखोरे, पोलीस अधीक्षक लखमी गौतम, माजी राज्यमंत्री वसुधा देशमुख, आ. यशोमती ठाकुर, महापौर रिना नंदा, जि.प. अध्यक्ष सतिश उईके, किरणताई महल्ले, मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील, अधिक्षक अभियंता बनगीनवार, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी आदी उपस्थित होते. श्यामाप्रसाद मुखर्जी अभियान, विशेष शिष्यवृत्ती योजना, समता व सामाजिक न्याय वर्षानिमित्त, महाआरोग्य अभियान, सीआरएफ च्या माध्यमातून रस्ते विकास आदिंची तपशिलवार माहिती पोटे यांनी देऊन उपस्थित सर्व जनतेस शासनाच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी ध्वजदिन निधी संकलनात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल विभागीय आयुक्त राजुरकर, जिल्हाधिकारी गित्ते, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी फ्ला.ले. रत्नाकार चरडे, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरुण शेळके यांचा गौरव करण्यात आला. यावेळी मैदानावरील सर्व उपस्थित पथकांकडून पालकमंत्र्यांना मानवंदना देण्यात आली. पालकमंत्र्यांनी संपूर्ण परेडचे निरीक्षण केले. विद्यार्थ्यांनी लेझीम, कवायती आदी आकर्षकपणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

Web Title: False hoisting at the official ceremony of Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.