महाराष्ट्रदिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण
By Admin | Updated: May 2, 2015 00:32 IST2015-05-02T00:32:04+5:302015-05-02T00:32:04+5:30
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५५ वा वर्धापन दिन शहरात उत्साहात पार पडला. ...

महाराष्ट्रदिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण
परेडचे निरीक्षण : जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांची उपस्थितीत
अमरावती : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५५ वा वर्धापन दिन शहरात उत्साहात पार पडला. पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते येथील जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर मुख्य शासकीय समारंभात सकाळी ८ वाजता राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. ध्वजारोहरणानंतर सर्वांनी राष्ट्रगीत गायिले. पालकमंत्र्यांनी परेडचे निरीक्षण केले. याप्रसंगी विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकांत उघडे, पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभू, प्रभारी पोलीस आयुक्त सोमनाथ घार्गे, महापौर चरणजितकौर नंदा, माहिती आयुक्त डी.आर. बनसोड आदी उपस्थित होते.
पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. जिल्हाधिकारी किरण गित्ते हे पश्चिम त्रिपुराची राजधानी आगारतळा येथे कार्यरत असताना आर्थिक समावेशन प्रकल्प उत्कृष्टरीत्या राबविल्याबाबत पंतप्रधानांच्या हस्ते २१ एप्रिल रोजी पहिला लोकप्रशासन पंतप्रधान पुरस्कार प्राप्त झाला. त्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. अमरावती विभागस्तरावर उत्कृष्ट कामाबद्दल उपजिल्हाधिकारी सर्वश्री गजेंद्र बावणे, तहसीलदार श्रीकांत उंबरकर, स्वीय सहायक महेंद्र गायकवाड, लघुलेखक रवींद्र मोहोड, कनिष्ठ लिपिक विजय सूर्यवंशी, मंडल अधिकारी अमोल देशमुख, तलाठी प्रवीण कावलकर, शिपाई रमेश मोरे यांचा गौरव करण्यात आला.
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्रामस्पर्धा सन २०१२-१३ साठी ग्रामपंचायत मडाखेड यांना दहा लाखांचा प्रथम पुरस्कार, ग्रामपंचायात चेनुष्ठा ता.तिवसा, ग्रामपंचायत चिंचोली यांना विभागून प्रत्येकी चार लाख रुपयांचा द्वितीय क्रमांकाचे सामूहिक बक्षीस देण्यात आले. साने गुरुजी स्वच्छ शाळा स्पर्धेचा प्रथम पुरस्कार सांगळुद जिल्हा परिषदेस शाळेस एक लाख रुपयाचा प्रथम पुरस्कार, सावित्रीबाई फुले स्वच्छ आंगणवाडी स्पर्धा ५० हजार रुपयांचा प्रथम पुरस्कार, गव्हाणकुंड येथील अंगणवाडी केंद्रास देण्यात आला. स्व.वसंतराव नाईक स्मृती पुरस्कार ग्रामपंचायत धानोरा बु. यांना ३० हजार रुपयांचे बक्षीस, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार ग्रामपंचायत आगर यांना ३० हजार रुपये बक्षीस, स्व.आबासाहेब खेडकर यांना स्मृती पुरस्कार ग्रामपंचायत खडका यांना ३० हजारांचे बक्षीस, साने गुरुजी स्वच्छ शाळा पुरस्कार सन २००९-१० प्रथम पुरस्कार एक लाख रुपये जिल्हा परिषद शाळा महमदपूर ता.बाबुळगाव यांना देण्यात आला. सावित्रीबाई फुले स्वच्छ आंगणवाडी पुरस्कार सन २००९-१० पुरस्कार आंगणवाडी केंद्र राहुड यांना देण्यात आला. पर्यावरण संतुलन समृद्ध ग्राम योजनेअंतर्गत देवगाव ग्रामपंचायत घोडगाव ग्रामपंचायत चेनुष्ठा, चांदूरवाडी व ग्रामपंचायत भिलटेक यांना विकासरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. क्रीडा स्पर्धेत पदक प्राप्त केल्याबद्दल दीक्षा गायकवाड, पायल अजमिरे, निहारिका परिहार, शलका धामणगावकर, पूजा कोसे, सांजली वानखडे, वैष्णवी श्रीवास, सुमित गव्हाणे आदीचा गौरव करण्यात आला.