शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

भाजीपाल्याच्या भावात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 11:41 PM

भाजीबाजारात विविध प्रकारच्या भाज्यांची आवक वाढली आहे. मात्र, भाव गडगडले आहेत. किरकोळ विक्रेत्यांचीसुद्धा हीच स्थिती असून, टोमॅटोला चांगला भाव नसल्यामुळे त्यांचा खप व्हावा म्हणून गाडगेनगर येथील किरकोळ विक्रत्यांनी त्यासोबत ‘वांगी फ्री’चे फलकच लावले आहेत.

ठळक मुद्देटोमॅटोसोबत वांगी मोफत : उन्हाळा असूनही भाव मिळेना

संदीप मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भाजीबाजारात विविध प्रकारच्या भाज्यांची आवक वाढली आहे. मात्र, भाव गडगडले आहेत. किरकोळ विक्रेत्यांचीसुद्धा हीच स्थिती असून, टोमॅटोला चांगला भाव नसल्यामुळे त्यांचा खप व्हावा म्हणून गाडगेनगर येथील किरकोळ विक्रत्यांनी त्यासोबत ‘वांगी फ्री’चे फलकच लावले आहेत. भाव कमी असूनही ग्राहकांचा प्रतिसाद न मिळाल्याने उत्पादकांवर काय परिस्थिती ओढवली असेल, याचा अंदाज यातून येऊ शकतो.नाशिक व ग्रामीण भागातून येणाऱ्या पांढºया कांद्याने शेतकºयांच्या डोळ्यांत पाणी आणले. कांद्याला सोमवारी कमीत कमी ४०० व जास्तीत जास्त ७०० रुपये क्विंटलचा भाव मिळाला. याची आवक ४२५ क्विंटल ऐवढी होती. लाला कांदा ४०० ते ७०० रुपये, आवक २१० क्विंटल, तर पांढरे बटाटे १२०० ते १६०० रुपये क्विंटलने विकले गेले. याची आवक ४५५ क्विंटल होती. लाल बटाट्याला १२०० ते १७०० रुपये भाव मिळाला. आवक १२० क्विंटल होती. टोमॅटोला फारच कवडीमोल भाव मिळत आहे. बाजारपेठेत मंगळवारी ५०० ते ६०० रुपये क्विंटल भाव मिळाला आहे. याची आवक ६५ क्विंटल एवढी होती. वांगी ६०० ते ७०० रुपये दराने होती. आवक फक्त २० क्विंटल होती. फूलकोबीला २२०० ते २४०० रुपये दर भाव मिळाला. आवक मात्र १५ क्विंटलच होती. उन्हाळ्यात भाज्या जास्त काळ टिकत नसल्याने मिळेल त्या भावाने विक्री करीत आहेत. टोमॅटोला भाव न मिळाल्याने त्यासोबत वांगी मोफत विक्रीची शक्कल लढविली आहे.