शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
2
Manoj Jarange Patil Morcha Live: मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत दाखल; हजारो आंदोलकांसोबत मनोज जरांगे आझाद मैदानाकडे
3
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
4
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय
5
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
6
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
7
गुरुजींसाठी नवे वेळापत्रक; गुणवत्ता वाढवा; प्रशासकीय जबाबदाऱ्याही घ्या
8
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
9
शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा-सांगली टप्प्याला अखेर राज्य शासनाची मान्यता
10
भाजपचे डॅमेज कंट्रोल; फडणवीस यांच्या समर्थनार्थ लागले बॅनर
11
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
12
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
13
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
14
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
15
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
16
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
17
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
18
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
19
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
20
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश

हरभऱ्याच्या भावात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 22:42 IST

शासनाने ४४०० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला असताना, स्थानिक बाजारात व्यापारी मात्र हमीपेक्षा एक हजारापेक्षा कमी दराने खरेदी करीत आहेत. नाफेडच्या १२ ही केंद्रांवर खरेदीची मंदगती व गोडाऊन किंवा ग्रेडर उपलब्ध नसल्याच्या कारणांमुळे शेतकºयांची लूट होत आहे

ठळक मुद्देनाफेडची खरेदी मंदावली : खासगीत हमीपेक्षा भाव कमी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासनाने ४४०० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला असताना, स्थानिक बाजारात व्यापारी मात्र हमीपेक्षा एक हजारापेक्षा कमी दराने खरेदी करीत आहेत. नाफेडच्या १२ ही केंद्रांवर खरेदीची मंदगती व गोडाऊन किंवा ग्रेडर उपलब्ध नसल्याच्या कारणांमुळे शेतकºयांची लूट होत आहेमागील रबी हंगामात जिल्ह्यात साधारणपणे १ लाख ५ हजार हेक्टरमध्ये हरभऱ्यांची पेरणी झाली. फेब्रुवारी अखेरपासून सवंगणी व मळणीचा हंगाम सुरू झाला. शासनाने १५ एप्रिलनंतर जिल्ह्यात १२ केंद्रावर ४४०० या हमीभावाने हरभऱ्यांची खरेदी सुरू केली. मात्र, सुरुवातीपासूनच खरेदीचा वेग मंदावला आहे. आतापर्यंत १२ हजार ३५० शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली असली तरी प्रत्यक्षात केंद्रावर फक्त ३४२३ शेतकºयांच्या ५७ हजार ५६७ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली.बाजार समित्यांमध्ये शेतमाल आधारभूत किमतीपेक्षा कमी भावाने खरेदी करता येत नाही, असे शासनादेश आहे. मात्र, जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये हा नियम गुंडाळून ठेवला आहे. विशेष म्हणजे, सहकार विभागदेखील या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे व्यापाºयांचे फावते. त्यामुळेच शेतमाल बेभाव खरेदी करण्यात येत असल्याचा आरोप शेतकºयांनी केला.केंद्र सुरू झाल्यानंतर आतापर्यंतची खरेदीजिल्ह्यातील १२ केंद्रांवर दीड महिन्यात ३४२३ शेतकऱ्यांकडून ५७ हजार ५६७ क्विंटल खरेदी करण्यात आली. यामध्ये अचलपूर केंद्रावर ३३० शेतकऱ्यांकडून ४६११ क्विंटल, अमरावती १३ शेतकऱ्यांकडून २५२, अंजनगाव सुर्जी १३८ शेतकऱ्यांकडून ३३५८, चांदूर बाजार ३१५ शेतकºयांकडून ६१२९, चांदूर रेल्वे १४२ शेतकऱ्यांकडून २,१९३, दर्यापूर १११७ शेतकऱ्यांकडून २० हजार २९२, धारणी ६३ शेतकऱ्यांकडून ११०९, नांदगाव खंडेश्वर १४४ शेतकऱ्यांकडून २,३५०, धामणगाव रेल्वे ९५१ शेतकऱ्यांकडून १३ हजार ९४३, मोर्शी ८२ शेतकºयांकडून १३७५, वरूड केंद्रावर ७५ शेतकऱ्यांकडून ११०० क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला.