मुलीच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:12 IST2021-04-05T04:12:34+5:302021-04-05T04:12:34+5:30
ब्राम्हमवाडा थडी-अमरावती : मुलीचे नावाने फेसबुक अकाऊंट बनवून त्यावर अश्लील मेसेज व अश्लील व्हिडीओ पाठवून तुझे फोटो फेसबुकवर टाकतो, ...

मुलीच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट
ब्राम्हमवाडा थडी-अमरावती : मुलीचे नावाने फेसबुक अकाऊंट बनवून त्यावर अश्लील मेसेज व अश्लील व्हिडीओ पाठवून तुझे फोटो फेसबुकवर टाकतो, अशी धमकी देणाºया आरोपीला स्थानिक पोलिसांनी सायबर पोलिसांच्या सहकार्याने हुडकून काढले आहे. याबाबत ३ मार्च रोजी ब्राम्हणवाडा थडी येथे तक्रार नोंदविण्यात आली होती. अज्ञाताविरूद्ध भादंविचे कलम ३५४ (ड), ५०६ भादंवि सहकलम ६६ (क), ६७, ६७ (अ) माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम १२ बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्हा तपासासाठी सायबर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. पोलीस निरीक्षक तपन कोल्हे, हवालदार सुनिल बनसोड,विकास अंजीकर, सागर धापड, रितेश वानखडे यांनी गुन्ह्यामध्ये आरोपी शोधकरिता तांत्रिक पद्धतीने व बुद्धीकौशल्य वापरुन तपास करुन आरोपी निष्पन्न केला. निलेश साहेबराव कुºहाडे (२३, रा. राम मंदिर चौक, घाटलाडकी) असे अटक आरोपीचे नाव आहे. सदर आरोपीस ब्राम्हणवाडा थडी येथील ठाणेदार दीपक वळवी, रविंद्र शिंपी, दिनेश वानखडे, सचिन भुजाडे व सायबर पोलीस स्टेशन यांनी संयुक्त कार्यवाही करून अटक केली. मोबाईलवर कोणत्याही अनोळखी व्यक्तीचे फ्रेंड रिक्वेस्ट किंवा अनोळखी लिंक आल्यास ती स्वीकारू नका तसेच अनोळखी व्यक्तीचे कॉल आल्यास त्यांना कोणत्याही प्रकारची माहिती देऊ नये, असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे.