शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
2
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
3
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
4
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
5
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
6
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
7
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
8
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
9
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
10
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
11
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
12
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
13
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
14
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
15
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
16
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
17
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
18
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
19
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
20
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
Daily Top 2Weekly Top 5

यूट्यूबच्या सहाय्याने बनविले बनावट एटीएम कार्ड, आरोपी बिस्वासची कबुली; राज्यभरातील बँक खातेदारांची फसवणूक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2017 18:24 IST

मुख्य आरोपी हरिदास हरविलास बिस्वास (२९, रा.जि. मलकानगिरी, ओडिशा) याने यू-ट्यूबच्या व्हिडीओवरून बनावट एटीएम कार्ड बनवून ग्राहकांच्या बँक खात्यातून रकमेची परस्पर उचलेगिरी केल्याची कबुली अमरावती पोलिसांनी दिली आहे.

वैभव बाबरेकरअमरावती : मुख्य आरोपी हरिदास हरविलास बिस्वास (२९, रा.जि. मलकानगिरी, ओडिशा) याने यू-ट्यूबच्या व्हिडीओवरून बनावट एटीएम कार्ड बनवून ग्राहकांच्या बँक खात्यातून रकमेची परस्पर उचलेगिरी केल्याची कबुली अमरावती पोलिसांनी दिली आहे. अमरावती पोलिसांनी त्याच्यासह विशाल तुळशीराम उमरे (३४, रा. वरोरा, चंद्रपूर) व किसन लालचंद यादव (३०, रा. गाजीपूर, दिल्ली) या तिघांना प्रॉडक्शन वाँरटवर ताब्यात घेऊन चंद्रपूरहून शनिवारी अमरावतीत आणले. बँक खातेदारांच्या खात्यातून परस्पर पैसे चोरणाºया टोळीतील परितोष पोतदार नामक आरोपीला अमरावती पोलिसांनी दिल्लीतून अटक केली. चंद्रपूर पोलिसांनीही या टोळीतील तिघांना अटक केली. अमरावती जिल्ह्यात घडलेल्या २३ गुन्ह्यांत या आरोपींची चौकशी सुरू आहे. तिन्ही आरोपींची पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्यासमक्ष पेशी झाली. त्यावेळी हरिदास बिस्वासने फसवणुकीचा फंडा उघड केला. दिल्लीत एमबीएचे शिक्षण घेत असताना त्याने इंटरनेटच्या माध्यमातून यू-ट्यूबवर एटीएम क्लोनिंगचे व्हिडीओ पाहिले. त्यानेही बनावट एटीएम कार्ड बनविण्याचा बेत आखला. यासाठी अन्य सहकारी आरोपींना विविध राज्यांमध्ये एटीएमधारकांचा डेटा चोरण्यास पाठविले. विशाल उमरे हा विदर्भातील विविध एटीएममध्ये जाऊन ग्राहकांच्या मागे उभा राहून त्यांच्या एटीएमचे १६ अंक व पीन हेरायचा व लगेच मोबाइलवर टाइप करून दिल्लीत बसलेल्या बिस्वासला पाठवायचा. बिस्वास ब्लँक एटीएम कार्ड मार्केटमधून विकत घेऊन लॅपटॉप व 'एनकाऊन्टर कार्ड रायटर' या मशीनद्वारा खातेदारांचे बनावट एटीएम कार्ड तयार करायचा. हे कार्ड किसनलाल यादवकडे पाठवून नोएडा, गुडगाव येथील एटीएममधून पैसे काढण्यासाठी पाठवायचा. या कामासाठी किसनलाल यादवला २० टक्के कमिशन मिळत होते. अशाप्रकारे देशभरातील अनेक बँक खात्यातून लाखो रुपयांची रोख चोरल्याची माहिती बिस्वासने अमरावती पोलिसांना दिली. 

एटीएम, शॉपिंग मॉलमध्येही काढला मागबिस्वासचे सहकारी एटीएम, शॉपिंग मॉल व अन्य आॅनलाइन खरेदीच्या ठिकाणी जाऊन बँक खातेदारांचा डेटा हेरायचे. विशाल उमरे याच कामासाठी अमरावतीत निर्मला लॉजवर राहिल्याची कबुली त्याने पोलिसांनी दिली. बँक खातेदारांच्या मागे उभे राहून शोल्डर रिडिंगचा फंडा वापरून तो नागरिकांच्या हातातील एटीएमवर लक्ष वेधायचा. त्यावरील १६ पैकी ८ अंक जवळपास सारखेच असायचे. त्यामुळे केवळ शेवटचे चार अंक मोबाइलवर टाइप करून ते लगेच बिस्वासला पाठवायचे.  पैसे विड्रॉल करणाºया खातेदार कोणता पिन टाइप करतो, याकडे तो लक्ष ठेवायचा. ते चार अंक स्मरणात ठेवून काही वेळानंतर तो बिस्वासला पाठवायचे काम विशाल करीत होता. यासाठी बिस्वास विशालला ५०० रुपये द्यायचा. खात्यातून जास्त रक्कम निघाली, तर १० टक्के कमिशनसुद्धा देत होता.

नोटाबंदीच्या काळ्यात मंदावला धंदाहरिदास बिस्वास हा २००९ मध्ये शिक्षणासाठी दिल्लीत गेला. भाड्याने खोली करून तो बहिणीसोबत राहत होता. कालातंराने त्याने सायबर गुन्हेगारीत प्रवेश केला. नोटाबंदीच्या काळात एटीएममधून केवळ दोन हजार रुपयेच निघत असल्याने त्याचा धंदा मदावला होता. 

अमरावतीतून चोरला सर्वाधिक डेटा विशाल उमरे याने शहरातील एक लॉजवर राहून दररोज एटीएमची झडती घेतली. एसबीआयची बडनेरा शाखा, श्याम चौक स्थित मुख्य शाखा, राठीनगर व गाडगेनगरातील शाखेत दररोज रांगेमध्ये उभे राहून बँक खातेदारांची माहिती बिस्वासला मोबाइलवर पाठविण्याचे काम केले. राज्यभरातील गुन्ह्यांचा आलेख लक्षात घेता, अमरावतीमधून विशालने सर्वाधिक डेटा चोरल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.  

बँक खाती गोठवलीशेकडो जणांच्या बँक खात्यावर डल्ला मारणाºया बिस्वासकडून चंद्रपूर पोलिसांनी ५६ हजारांची रोख जप्त केली आहे. बिस्वास ३० टक्के रक्कम ठेवून कमिशन व वाहतुकीवर इतर खर्च करीत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. या गोरखधंद्यातून सहा लाखांची कमाई केल्याचे तो सांगत असला तरी ही रक्कम बरीच मोठी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.