मेळघाटातील ३९२ गावांमध्ये सुदृढ मेळघाट अभियान
By Admin | Updated: June 16, 2017 00:04 IST2017-06-16T00:04:43+5:302017-06-16T00:04:43+5:30
१४ ते २७ जून या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या सदृढ मेळघाट अभियानाचा प्रारंभ पंचायत समिती सभापती

मेळघाटातील ३९२ गावांमध्ये सुदृढ मेळघाट अभियान
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : १४ ते २७ जून या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या सदृढ मेळघाट अभियानाचा प्रारंभ पंचायत समिती सभापती कविता काळे यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आला.
हे अभियान दररोज ४० पथकांमार्फत २७ जूनपर्यंत ३९२ गावांमध्ये राबविले जाईल. या अभियानांतर्गत सर्व गरोेदर, स्तनदा माता व बालकांची तपासणी आणि उपचार, तसेच लसीकरण, साथरोग उपाययोजना, मातांना आरोग्य शिक्षण, समुपदेशन, लसीकरणापासून वंचित पालक व मातांना लसीकरण केले जाणार आहे. पावसाळ्यात होणारे जलजन्य आजार व किटकजन्य आजारांना प्रतिबंध घालण्याकरिता जनजागृती देखील केली जाईल. यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.