पदवीधर शिक्षकांना वेतनश्रेणी देण्याचा मार्ग सुकर
By Admin | Updated: October 22, 2016 00:14 IST2016-10-22T00:14:25+5:302016-10-22T00:14:25+5:30
जिल्हा परिषदेच्या पदवीधर शिक्षकांना लागू असलेली वेतनश्रेणी तीन महिन्यांपूर्वी अचानक थांबविण्यात आली होती.

पदवीधर शिक्षकांना वेतनश्रेणी देण्याचा मार्ग सुकर
शासन निर्णय : १३ आॅक्टोबर रोजी आदेश धडकले
अमरावती : जिल्हा परिषदेच्या पदवीधर शिक्षकांना लागू असलेली वेतनश्रेणी तीन महिन्यांपूर्वी अचानक थांबविण्यात आली होती. याचा फटका काही शिक्षकांना बसला होता. यावर आता शासनाच्यावतीने तोडगा काढण्यात आला. आता निकषानुसार शिक्षकांना वेतनश्रेणी तयार केली जाणार आहे.
इयत्ता सहावी ते आठवी या वर्गांना शिकविणाऱ्या शिक्षकांना १/३ शिक्षकांना सेवाज्येष्ठतेनुसार पदविधर वेतनश्रेणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या वर्गांना शिकविण्याचा शिक्षकांची संख्या ही ३ पेक्षा अधिक असल्यास पदविधर वेतनश्रेणी अनुज्ञेय असणाऱ्या शिक्षकांची संख्या त्या प्रमाणात एकापेक्षाअधिक असल्यास अशा शिक्षकांची संख्या अधिक असल्यास संबंधित विषय अनुदानित सेवाज्यष्ठतेनुसार पदविधर वेतनश्रेणी समप्रमाणात देय राहील, अशा प्रकारे एक अंकित ३ शिक्षकांना पदविधर वेतनश्रेणी देय ठरत असल्यास प्रत्येक विषय अनुदानित प्रत्येकी एका शिक्षकाला पदविधर वेतनश्रेणी मिळणार आहे. प्रत्यक्षात पदविधर म्हणजेच कोणत्याही शाखेतील पदविधर अधिक डीएड किंवा बीएड असा आहे. सेवेत रुजू होताना इयत्ता दहावी व बारावी आणि डी.एड आर्हता प्राप्त केली असल्यास यात शिक्षकांनाही प्रशिक्षित पदविधर समजण्यात येणार आहे. दरम्यान बालकांचा मोफत व हक्काचे शिक्षण कायदा २००९ अंतर्गत उच्च प्राथमिक स्तरावर विज्ञान, भाषा आणि सामाजिक शास्त्र या विषयातील प्रत्येक किमान एक याप्रमाणे प्रशिक्षित पदविधर आर्हता धारक शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात याव्यात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या शिक्षकांच्या प्रश्नाला काही प्रमाणात तोडगा निघाला आहे, तर शिक्षकांना होणारा मानसिक त्रासही या माध्यमातून कमी होणार आहे. (प्रतिनिधी)
या निर्णयानुसार टप्प्या टप्प्याने ही श्रेणी लागू केली जाणार आहे. मात्र, कृती समितीने पूर्वी सुरू असल्याप्रमाणे वेतनश्रेणी देण्यात यावी अशी मागणी आम्ही केलेली आहे. त्यामुळे ही वेतनश्रेणी लागू करायला ही अशी आमची मागणी आहे.
- राजेश सावरकर, राज्य प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती