शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभरापासून आय ओटी बंद; 'इर्विन'मधील नेत्र शस्त्रक्रियांना ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 11:06 IST

Amravati : इमर्जन्सी रुग्णांना केले जाते पीडीएमसीमध्ये रेफर

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथील आय ओटी एक महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून बंद आहे. या ओटी परिसरात सुरू असलेल्या नव्या आयसीयू इमारतीच्या कामकाजामुळे येथे होणाऱ्या मोतीबिंदू, तसेच इतर डोळ्यांच्या शस्त्रक्रिया थांबल्या आहेत, त्यामुळे ज्या रुग्णांची इमर्जन्सी शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे. अशा रुग्णांना डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे रेफर करण्यात येत असल्याची माहिती आहे. 

जिल्हा सामान्य रुग्णालय येथील डोळ्यांच्या ओपीडीमध्ये रोज ७० ते ८० रुग्ण हे उपचारासाठी येतात. यामध्ये वयोवृद्ध रुग्णांचा समावेश मोठ्या प्रमाणावर असतो. यामध्ये मोतीबिंदूमुळे दिसण्याचा त्रास असलेल्या रुग्णांच्या मोफत शस्त्रक्रियादेखील याच ठिकाणी करण्यात येतात. रोज सरासरी २० ते २५ रुग्णांच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रिया रुग्णालयात होतात, तर महिन्याला जवळपास सहाशे ते सातशे मोतीबिंदू शस्त्रक्रिया होतात, जिल्ह्यात केवळ इर्विन या शासकीय रुग्णालयातच डोळ्यांच्या शस्त्रक्रिया होत असल्याने येथे ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. येथील नेत्र विभागातील कामाची दखल घेत राज्य शासनाच्या वतीने या विभागाला गौरविण्यात आले होते; परंतु एक महिन्यापासून येथील डोळ्यांच्या शस्त्रक्रिया बंद आहेत. आय ओटी परिसरातच ५० खाटांच्या आयसीयू इमारतीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे येथील धूळ आय ओटीमध्ये येत असल्याने या शस्त्रक्रिया थांबविण्यात आल्या आहेत. त्यामुळे येथील आय ओपीडी सुरु करण्याची मागणी होत आहे.

"आय ओटीजवळच आयसीयू इमारतीचे काम सुरु आहे. त्यामुळे याठिकाणी उडणाऱ्या धुळीमुळे तात्पुरत्या स्वरुपात आय ओटी बंद ठेवण्यात आली आहे. लवकरच ओटी सुरु करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करण्यात येतील."- डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा शल्यचिकित्सक

 

टॅग्स :AmravatiअमरावतीHealthआरोग्य