धामणगावात २१५ रुग्णांची नेत्रतपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:23 IST2021-02-05T05:23:24+5:302021-02-05T05:23:24+5:30
धामणगाव रेल्वे : लायन्स क्लब धामणगाव एलिटच्यावतीने बापूराव बुटले स्मृतीप्रीत्यर्थ आयोजित नेत्ररोग निदान व औषधोपचार शिबिरात २१५ ...

धामणगावात २१५ रुग्णांची नेत्रतपासणी
धामणगाव रेल्वे : लायन्स क्लब धामणगाव एलिटच्यावतीने बापूराव बुटले स्मृतीप्रीत्यर्थ आयोजित नेत्ररोग निदान व औषधोपचार शिबिरात २१५ रुग्णांची नेत्रतपासणी करण्यात आली. दत्तापूर येथे हे शिबिर घेण्यात आले. शिबिरात डॉ. स्वप्निल बोरगे, डॉ. राजेश काळे, डॉ. किरण काळे या नेत्ररोगतज्ज्ञांनी २१५ जणांची नेत्रतपासणी केली. लायन्स क्लबच्यावतीने या रुग्णांना मोफत औषधोपचार करण्यात आला. आमदार प्रताप अडसड यांनी या नेत्ररोग शिबिराला भेट दिली. लायन्स कल्ब एलिटचे अध्यक्ष विलास बुटले, प्रकल्प निदेशक विनय शिरभाते, संजय सायरे, चेतन परडखे, देवेंद्र वानखेडे, चेतन कोठारी, सतीश बूब, अरविंद चनेकर, डॉ. विनायक त्रिपतीवार, डॉ. योगेंद्र गाडोळे, बारापात्रे, सूर्यकांत रोडगे, सुनील जावरकर, विक्रम बुधलानी, मंगेश शिंदे, रवि गायकवाड, बाबा ठाकूर व किरण निस्ताने सहभागी झाले.