१६२ पैकी ७५ बस चालकात नेत्रदोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2023 18:19 IST2023-09-01T18:19:29+5:302023-09-01T18:19:36+5:30
रक्तदाब , मधुमेह , नेत्र तपासणी याचा समावेश करण्यात आल्याने वाहन चालकांनी शरीरातले सायलेंट किलर ओळखणे गरजेचे झाले आहे.

१६२ पैकी ७५ बस चालकात नेत्रदोष
-मनीष तसरे
अमरावती :भारतात रस्ते अपघात ही एक गंभीर समस्या निर्माण झाली आहे. रस्ते अपघाताचे कारणे विश्लेषण केले असता बहुतांश रस्ते अपघातात वाहन चालक कारणीभूत ठरत आहे. नेमकी हीच कारणे हेरून परिवहन विभागाने राज्यात बस चालकांची आरोग्य तपासणी मोहीम हाती घेतली आहे.
यामधे रक्तदाब , मधुमेह , नेत्र तपासणी याचा समावेश करण्यात आल्याने वाहन चालकांनी शरीरातले सायलेंट किलर ओळखणे गरजेचे झाले आहे. आरोग्याच्या बाबतीत शारीरिक व्याधीमधे जे सायलेंट किलर म्हणून ओळखले जातात त्याची नियमित तपासणी होणे गरजेचे असून त्यावर वेळीच आळा घालावा या करिता आरोग्य तपासणी होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गीते यांनी या प्रसंगी व्यक्त केले
या दोन दिवसीय आरोग्य तपासणी शिबिरात १६२ बस वाहन चालकांनी आरोग्य तपासणी करून घेतली.या पैकी कोणत्याही बस वाहनचालकात आरोग्य विषयक व्याधी आढळून आल्या नाहीत.या शिबिरात तपासणी करण्यात आलेल्या १६२ बस चालकांपैकी ७५ जणांना दृष्टीदोष असल्याचे आढळून आले आहे.७५ बसवाहन चालकांच्या डोळ्यांमध्ये दोष आढळला असल्याने त्यांना मोफत चष्मे देण्यात येणार आहेत.