आॅनलाईन शिष्यवृत्ती अर्जाला मुदतवाढ
By Admin | Updated: January 20, 2015 22:31 IST2015-01-20T22:31:00+5:302015-01-20T22:31:00+5:30
महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या शिष्यवृत्तीसाठी आॅनलाईन अर्ज करण्याची मुदत ३१ जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. मात्र, अर्ज भरताना सर्व्हर डॉऊन

आॅनलाईन शिष्यवृत्ती अर्जाला मुदतवाढ
तांत्रिक अडचण : अर्ज आले कमी; आता ३१ जानेवारीची मुदत
अमरावती : महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या शिष्यवृत्तीसाठी आॅनलाईन अर्ज करण्याची मुदत ३१ जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. मात्र, अर्ज भरताना सर्व्हर डॉऊन किंवा पासवर्ड रिलॉगीन होत नसल्याच्या समस्या उद्भवत आहेत. समाज कल्याण विभाग तांत्रिक अडचणी सोडविण्यापेक्षा ‘तारीख पे तारीख’ वाढवत आहे.
शैक्षणिक वर्ष २०१४-१५ साठी शिष्यवृत्तीचे (नवीन नूतनीकरण), राजर्षी शाहू महाराज विद्यावेतन आणि परराज्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासन शिष्यवृत्तीचे अर्ज करण्याची मुदत ३१ डिसेंबरला संपली होती, ती १५ जानेवारीपर्यंत वाढवली होती. आता पुन्हा मुदतवाढ दिली आहे. आणखी किती वेळा मुदतवाढ देणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
आतापर्यंत केवळ ४० हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरला आहे. आणखी हजारो विद्यार्थी आॅनलाईन अडचणीमुळे अर्ज भरू शकले नाही. अनेक विद्यार्थ्यांच्या अर्जात त्रुटी होत्या त्यामुळे अर्ज सादरीकरणासाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी अनेक राजकीय, सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली होती. त्यानंतर सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी शिष्यवृत्ती परीक्षेचे आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे.