शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

लाडकी बहीण योजनेंतर्गत ई-केवायसीसाठी मुदतवाढ; या तारखेच्या आत भरा फॉर्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 18:47 IST

Amravati : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनी ई-केवायसी करताना तांत्रिक किंवा नजरचुकीने माहिती भरताना चूक केली.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनी ई-केवायसी करताना तांत्रिक किंवा नजरचुकीने माहिती भरताना चूक केली. अशा लाडक्या बहिणी आता ऑनलाइन ई-केवायसी करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत सुधारणा करण्यासाठी शेवटची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे.

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना ई-केवायसी करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुदत दिली होती. परंतु सदर प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थी महिलांकडून लाभार्थ्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित, कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकार स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तिवेतन घेत आहे किंवा कसे याबाबतपर्याय निवडताना हजारो महिलांना चुकीचा पर्याय निवडला गेल्याची बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळे योजनेतील निकषाच्या अनुषंगाने सदर लाभार्थी महिलांची सखोल तपासणी करून लाभार्थ्याच्या पात्रता-अपात्रतेची प्रत्यक्ष पडताळणी करण्याबाबत जिल्हाधिकारी यांना शासनाने २० जानेवारी २०२६ रोजी एका आदेशान्वये निर्देश दिले होते.

तथापि सदर लाभार्थीची जलदगतीने पडताळणी करण्यासाठी ऑनलाईन -केवायसीमध्ये पुन्हा सुधारणा करण्याची संधी देण्यात यावी, अशी मागणी योजनेच्या लाभार्थ्यांकडून व क्षेत्रीय कार्यालयाकडून होत आहे. त्याअनुषंगाने ऑनलाइन ई-केवायसीमध्ये एकदा सुधारणा करण्याची संधी उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार शासनाने आता 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेंतर्गत ३१ डिसेंबरपर्यंत ज्या लाभार्थी महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे, परंतु सदर प्रक्रिया पूर्ण करताना पर्याय निवडताना नजरचुकीने चुकीचा पर्याय निवडलेल्या लाभार्थी महिलांसाठीच ऑनलाइन ई-केवायसीमध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी ३१ मार्चपर्यंत उपलब्ध करून दिलेली आहे.

३१ मार्चपर्यंत शेवटची संधी

लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी योजनेतील चुकांची दुरुस्ती करण्यासाठी ६ फेब्रुवारी रोजी शासनाने ३१ मार्चपर्यंत मुदत दिली आहे. ही मुदतवाढ देताना यापुढे कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे शासनाकडून जारी आदेशात स्पष्ट केले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ladki Bahin Yojana: E-KYC Deadline Extended; Correct Forms by March

Web Summary : Women benefiting from Ladki Bahin Yojana get an extension until March 31 to correct e-KYC errors. This offers a crucial opportunity for rectification.
टॅग्स :ladki bahin yojanaलाडकी बहीण योजनाAmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्र