‘कृषी संजीवनी’ योजनेला मुदतवाढ हवी
By Admin | Updated: December 9, 2014 22:44 IST2014-12-09T22:44:02+5:302014-12-09T22:44:02+5:30
अतिशय कमी पर्जन्यमान, शिवाय अवकाळी पाऊस, यामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेला त्यामुळे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सुरू असलेल्या कृषी संजीवनी योजनेस यंदा मुदतवाढीची आवश्यकता आहे.

‘कृषी संजीवनी’ योजनेला मुदतवाढ हवी
अमरावती : अतिशय कमी पर्जन्यमान, शिवाय अवकाळी पाऊस, यामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेला त्यामुळे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सुरू असलेल्या कृषी संजीवनी योजनेस यंदा मुदतवाढीची आवश्यकता आहे. मुदतवाढ मिळाल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो.
शेतकऱ्यांकडील थकीत कृषी वीज पंपाचे बील वसुलीसाठी ५० टक्के वीज माफ करण्याचे नियामक मंडळाचे नियोजन आहे. यंदाही वीज वितरण कंपनीने ३१ आॅक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांना वीज बिल भरण्याची मुदत दिली. परंतु यंदाचा खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला. पेरणीपासून दीड महिना उशीराने असलेला पाऊस कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, पूर्णत: बाद झाले. मागील वर्षी अति पावसाने खरीप व रबीचा घात केला त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात अडकला आहे. यामुळे यंदा वीज भरणे शेतकऱ्यांना शक्य नाही. या योजनेला शासनाने मार्च अखेरपावेतो मुदतवाढ दिली तर शेतकऱ्यांनी वीज बिल भरणे सोयीचे होईल. याशिवाय वीज कंपनीलाही वसुलीसाठी सुलभ होईल. याविषयी शेतकरी नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे.