अमरावती, अचलपूर कंटेनमेंट झोनची व्याप्ती वाढविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:20 IST2021-02-23T04:20:35+5:302021-02-23T04:20:35+5:30
अमरावती : महापालिका क्षेत्र व अचलपूर नगरपालिका या कंटेनमेंटची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अमरावती तालुक्यातील कठोरा बु, ...

अमरावती, अचलपूर कंटेनमेंट झोनची व्याप्ती वाढविली
अमरावती : महापालिका क्षेत्र व अचलपूर नगरपालिका या कंटेनमेंटची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अमरावती तालुक्यातील कठोरा बु, रामगाव, नांदगाव पेठ, वलगाव, रेवसा, बोरगाव धर्माळे या गावांतील बिझीलॅन्ड, सीटीलॅन्ड ड्रिमलॅन्ड मार्केट तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोझरी व अचलपूर तालुक्यातील कांडली व देवमाळी तसेच भातकुली तालुक्यातील भातकुली नगरपंचायतींचा यात समावेश करण्यात आलेला आहे.
या क्षेत्रातील जीवनावश्यक वस्तू, किराणा व औषधालये व रेशन दुकाने १ मार्चपर्यंत सकाळी ८ ते दुपारी ३ पर्यंत सुरू राहतील. याशिवाय अन्य आस्थापना बंद राहतील. ज्या उद्योगांना एमडीसीने परवानगी दिली ती सुरू राहतील. आठवडी बाजार, शाळा, महाविद्यालये, सिनेमागृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन शैक्षनिक, सांस्कृतिक कार्यक्रम बंद राहतील. मालवाहतूक सुरू राहील. तसेच सर्व धार्मिक स्थळे बंद राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.