भररस्त्यात स्फोटकांच्या टाक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 23:48 IST2017-08-18T23:47:48+5:302017-08-18T23:48:37+5:30

शहरात अत्यंत वर्दळीच्या रस्त्यांलगत भीषण स्फोट घडवून आणण्याची क्षमता असलेल्या स्फोटकांच्या टाक्या आहेत.

Explosive Tanks in the Flood | भररस्त्यात स्फोटकांच्या टाक्या

भररस्त्यात स्फोटकांच्या टाक्या

ठळक मुद्देस्थानांतरण केव्हा ? : हजारो नागरिकांच्या जिविताशी खुलेआम खेळ

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरात अत्यंत वर्दळीच्या रस्त्यांलगत भीषण स्फोट घडवून आणण्याची क्षमता असलेल्या स्फोटकांच्या टाक्या आहेत. हजारो नागरिकांच्या जिविताशी हरघडी होत असलेला हा मृत्यूखेळ 'ब्लू व्हेल गेम'पेक्षाही भयानक म्हणावा असाच आहे. एका लहानशा चुकीने क्षणात मृतदेहांचा खच पाडू शकणाºया या स्फोटकांच्या टाक्या केवळ प्रशासनाच्या 'मेहेरबानी'मुळेच वर्दळीच्या ठिकाणी शाबूत आहेत.
केंद्र सरकारच्या नव्या नियमानुसार पेट्रोलपंप सुरु करण्यापूर्वी पेट्रोलियम कंपन्यांकडून मालकांना ‘एनओसी’ची लांबलचक यादी सादर केली जाते. नाहरकत प्रमाणपत्रांशिवाय पेट्रोलपंपांना परवानगी मिळत नाही. मात्र, ४० ते ५० वर्षांपूर्वी पेट्रोलियम कंपन्यांचे नियम शिथिल असताना परवानगीप्राप्त पेट्रोलपंप आता धोकादायक ठरू लागले आहेत. काही पेट्रोलपंपांच्या इंधन टाक्या रस्ता डांबरीकरणात गेल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्त्यालगत अनेक पेट्रोलपंप आहे. यामुळे वाहतुकीला अडसर निर्माण होतो. यात भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियमच्या पंपांचा समावेश आहे. नागरिकांच्या जिविताला धोका निर्माण करून हे पेट्रोलपंप सुरू असताना जिल्हा प्रशासन गप्प आहे. ग्राहकांसाठी कोणत्याही सुविधा उपलब्ध नसणारे पेट्रोलपंप पेट्रोलियम वर्ग-१ नुसार बंद करण्याची कारवाई जिल्हाधिकाºयांना करता येते. तरीही धोकादायक पेट्रोलपंपांना अभय का, हा प्रश्न उरतोच. पेट्रोल हा ज्वलनशील पदार्थ असल्याने केव्हाही मोठा अपघात संभवतो. खासगी जागेवर पेट्रोलपंप असल्याचे सांगून मालक वेळ मारून नेत आहेत. जिल्ह्यात एकूण १३६ पेट्रोलपंप असून यात ग्रामीण भागात ११८ तर शहरात १८ पेट्रोलपंपांची नोंद प्रशासनाकडे आहे.

ग्राहकांशी निगडित असणाºया सुविधांसंदर्भात पेट्रोलपंप तपासणीचे निर्देश तहसीलदार, अन्नधान्य वितरण अधिकाºयांना दिले आहेत. तपासणी अहवाल प्राप्त होताच जिल्हाधिकाºयांच्या मार्गदर्शनात कारवाई केली जाईल. याबाबत गय केली जाणार नाही.
-अनिल टाकसाळे,
जिल्हा पुरवठा अधिकारी

नव्या पेट्रोलपंपासाठी १० ते १५ एनओसी लागतात. मात्र, ४० ते ५० वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या पेट्रोलपंपांमुळे सद्यस्थितीत वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा पंपांवरून डिझेलविक्री बंद आहे. त्यामुळे चारचाकी वाहने येथे येत नाहीत. हे पेट्रोलपंप खासगी जागेवर सुरु आहेत.
- हिमांशू केसरवानी,
सेल्स अधिकारी, बीपीसीएल

Web Title: Explosive Tanks in the Flood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.