जिल्ह्यात स्फोटक स्थिती, सहा मृत्यू, ९०६ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:18 IST2021-02-26T04:18:41+5:302021-02-26T04:18:41+5:30

अमरावती : जिल्ह्यात कोरोना संसर्गाची स्थिती स्फोटक झाली असून, कोेरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे सत्र सुरूच आहे. गुरुवारी पुन्हा सहा रुग्णांचा उपचारादरम्यान ...

Explosive conditions in the district, six deaths, 906 positive | जिल्ह्यात स्फोटक स्थिती, सहा मृत्यू, ९०६ पॉझिटिव्ह

जिल्ह्यात स्फोटक स्थिती, सहा मृत्यू, ९०६ पॉझिटिव्ह

अमरावती : जिल्ह्यात कोरोना संसर्गाची स्थिती स्फोटक झाली असून, कोेरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे सत्र सुरूच आहे. गुरुवारी पुन्हा सहा रुग्णांचा उपचारादरम्यान बळी गेल्याने संक्रमितांची मृत्यूची संख्या ४८७ झाली, तर ९०६ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ३२,८३१ झालेली आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढताच आहे. १ ते २५ फेब्रुवारी दरम्यान तब्बल १०,८५२ कोरोनाग्रस्तांची नोंद झालेली आहे. याच कालावधीत ३६,८११ चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये सरासरी २९.४८ टक्के पॉझिटिव्हिटी नोंद करण्यात आलेली आहे. याशिवाय जिल्ह्यात ११ महिण्यांच्या कोरोना काळात २,१८,५०६ चाचण्या करण्यात आल्या. यात सरासरी १५.०२ टक्के पॉझिटिव्हिटी आढळून आलेली आहे. ही राज्यात अन्य जिल्ह्याच्या तुलनेत उच्चांकी असल्याचे निरीक्षण आहे.

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य यंत्रणेसह डॉक्टरांच्या आढावा सभेत ३०० वाढीव खाटांचे नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत उच्चांकी ४,५८० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यात विविध रुग्णालयांत १,२४९ उपचार घेत आहेत तर होम आयसोलेशनमध्ये महापालिका क्षेत्रात २,३८७ व जिल्हा ग्रामीणमध्ये ९४४ रुग्ण सध्या या सुविधेचा लाभ घेत आहेत.

बॉक्स

गुरुवारी सहा बळी

(पाच ओळी जागा सोडणे, माहिती यायची आहे)

Web Title: Explosive conditions in the district, six deaths, 906 positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.