अल्पवयीन मुलीचे बाप-लेकाकडून शोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 01:32 IST2019-06-21T01:31:59+5:302019-06-21T01:32:21+5:30

अल्पवयीन मुलीला शेतातील झोपडीवर ठेवून तिचे शारीरिक शोषण करणाऱ्या २६ वर्षीय युवकाच्या बापानेही तिच्यावर अत्याचार केल्याची घटना तालुक्यातील सिद्धनाथपूर येथे १९ जून रोजी उघडकीस आली. याप्रकरणी लोणी पोलिसांनी बाप-लेकासह तिघांविरुद्ध पोक्सोसह विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला.

Exploit by a teenage girl's father-in-law | अल्पवयीन मुलीचे बाप-लेकाकडून शोषण

अल्पवयीन मुलीचे बाप-लेकाकडून शोषण

ठळक मुद्देप्रियकराचा शोध : लोणी पोलिसांत पोक्सो दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदगाव खंडेश्वर : अल्पवयीन मुलीला शेतातील झोपडीवर ठेवून तिचे शारीरिक शोषण करणाऱ्या २६ वर्षीय युवकाच्या बापानेही तिच्यावर अत्याचार केल्याची घटना तालुक्यातील सिद्धनाथपूर येथे १९ जून रोजी उघडकीस आली. याप्रकरणी लोणी पोलिसांनी बाप-लेकासह तिघांविरुद्ध पोक्सोसह विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला.
पोलीस सूत्रानुसार, सिद्धनाथपूर येथील रहिवासी गणेश शिवदास रंगे (२६), शिवदास भगवान रंगे (६०) व वनिता शिवदास रंगे (४५) अशी आरोपींची नावे आहेत. अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, नातेसंबंधातून गणेशशी तिचा परिचय होता. त्यांच्यात प्रेमसंबंध जुळल्यानंतर गणेशने तिला लग्नाचे आमिष दाखविले. मात्र, तिच्या आई-वडिलांनी विरोध दर्शविला. यानंतर त्याने तिला धमकावले आणि शेतातील झोपडीत ठेवले. तेथून कुठेच जायचे नाही, अशी तंबी त्याने दिली. मुलीचा विरोध असतानाही त्याने येथे तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
दरम्यान, १३ जून रोजी गावातून येतो म्हणून सांगून गेलेला गणेश सायंकाळपर्यंत परतला नाही तेव्हा मुलीने त्याचे गावातील घर गाठले. यावेळी त्याचे वडील शिवदास व आई वनिता घरी होते. गणेशबाबत विचारताच शिवदासने तिला घरात खेचले आणि अत्याचार केला. यावेळी आरडाओरड न करण्यासाठी वनिताने तिचे तोंड दाबले, असे तक्रारीत नमूद आहे. यासंदर्भात वाच्यता केल्यास मारून टाकण्याची धमकी शिवदासने दिली. त्यानंतर ती झोपडीवर निघून गेली. १९ जून रोजी गणेशला शोधण्यासाठी ती पुन्हा गावात आली असता, शिवदास काठी घेऊन आला आणि मारहाण केली. यादरम्यान कल्पना घाटे, हरिचंद्र बिल्लेवार, रामभाऊ बिल्लेवार यांनी तिला सोडविले. घटनास्थळी आलेल्या आई-वडिलांना सोबत घेऊन तिने लोणी पोलीस ठाणे गाठले. लोणी पोलिसांनी भादंविचे कलम ३७६, ३६३, ३६६, ३२४, ५०६, ३४ सहकलम ४ पोक्सो अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Exploit by a teenage girl's father-in-law