पंधराव्या वित्त आयोगातून हगणदारीमुक्त गावावर खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:17 IST2021-08-21T04:17:38+5:302021-08-21T04:17:38+5:30

अमरावती : पंधराव्या वित्त आयोगाचा निधी जिल्ह्याला मिळाला आहे. या निधीतून ग्रामपंचायतींना ५० टक्के बंधित निधी हगणदारीमुक्त गाव, पाणीपुरवठ्यावर ...

Expenditure on Haganadarimukta village from the 15th Finance Commission | पंधराव्या वित्त आयोगातून हगणदारीमुक्त गावावर खर्च

पंधराव्या वित्त आयोगातून हगणदारीमुक्त गावावर खर्च

अमरावती : पंधराव्या वित्त आयोगाचा निधी जिल्ह्याला मिळाला आहे. या निधीतून ग्रामपंचायतींना ५० टक्के बंधित निधी हगणदारीमुक्त गाव, पाणीपुरवठ्यावर खर्च करावा लागणार आहे. उर्वरित ५० टक्के निधीतून विकासकामे करता येणार आहेत. त्यामुळे गावात शौचालय तसेच इतर कामांना गती मिळणार आहे.

पंधराव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतीला ८० टक्के निधी मिळणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीला प्रत्येकी १० टक्के निधी दिला जात आहे. केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शनातील अटी व शर्तींनुसार हा निधी खर्च करता येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने बंधित आणि अबंधित, असे दोन प्रकार आहेत. यामध्ये बंधित निधीतून हगणदारीमुक्त गावातील कामे व पाणीपुरवठा कामावर खर्च करता येणार आहे. उर्वरित ५० टक्के निधीतून इतर कामे करता येणार आहेत. जिल्ह्याला १५ व्या वित्त आयोगातून कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाला आहे. या निधीतून हगणदारीमुक्त गावांतील कामे, तसेच पाणीपुरवठ्याच्या कामांना वेग येणार आहे.

बॉक्स

सदस्यांची भूमिका महत्त्वाची

प्रत्येक सदस्याच्या सर्कलमधील कामे प्रस्तावित केली जाणार आहेत. मुक्त निधीतून गावातील रस्ते, पाणंद रस्ते, अंगणवाडी बांधकाम, अंगणवाडी डिजिटल करणे आदी कामे करता येतील. गावातील निकड लक्षात घेता ही कामे ग्रामसेवक, सरपंचांच्या मर्जीत होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य कुठल्या कामांना प्राथमिकता देतात यावर सर्व काही अवलंबून आहे.

Web Title: Expenditure on Haganadarimukta village from the 15th Finance Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.