'त्या’ कलाकाराच्या आयुष्यासाठी चित्र प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:13 IST2021-04-01T04:13:08+5:302021-04-01T04:13:08+5:30

धामणगाव रेल्वे : जे.जे. कला महाविद्यालयातील एका गरीब माजी विद्यार्थ्याला रक्ताचा कर्करोग झाल्याने राज्यातील संपूर्ण कलारसिक एकवटले आहेत. ...

Exhibition of paintings for the life of 'that' artist | 'त्या’ कलाकाराच्या आयुष्यासाठी चित्र प्रदर्शन

'त्या’ कलाकाराच्या आयुष्यासाठी चित्र प्रदर्शन

धामणगाव रेल्वे : जे.जे. कला महाविद्यालयातील एका गरीब माजी विद्यार्थ्याला रक्ताचा कर्करोग झाल्याने राज्यातील संपूर्ण कलारसिक एकवटले आहेत. चित्रप्रदर्शन व विक्रीच्या माध्यमातून त्याच्याकरिता रक्कम गोळा करण्यासाठी ठिकठिकाणी आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त स्थानिक आर्ट फॉर आर्टिस्ट समूहाच्यावतीने धामणगावात पाच दिवसीय चित्र प्रदर्शन गुरुवारपासून सुरू होत आहे.

मुंबई येथील सर जे.जे. कला महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी सुशांत जगन्नाथ अंबोकर हा नवयुवक विद्यार्थी रक्ताच्या कर्करोगाने पीडित आहे. सुशांतची आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने त्याच्या उपचारात आपलाही खारीचा वाटा असावा म्हणून स्थानिक आर्ट फॉर आर्टिस्ट समूहाच्यावतीने शास्त्री चौकातील मातोश्री हाईट्स येथे १ ते ५ एप्रिल दरम्यान चित्र प्रदर्शना व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिक व कलारसिकांनी भेट देऊन तसेच चित्र खरेदी करून आर्थिक सहकार्य करावे, असे आवाहन आर्ट फॉर आर्टिस्ट समूहाने केले आहे.

--------------

Web Title: Exhibition of paintings for the life of 'that' artist