एसटी वाहकाची चिल्लरसाठी कसरत
By Admin | Updated: May 17, 2015 00:47 IST2015-05-17T00:47:37+5:302015-05-17T00:47:37+5:30
राज्य परिवहन महामंडळाच्या वाहकाला मिळणारी अग्रीम धनाची रक्कम आता १०० रुपये झाली आहे.

एसटी वाहकाची चिल्लरसाठी कसरत
डोकेदुखी वाढली : अग्रीम धन १० रुपयांवरुन १०० रुपयांवर
अमरावती : राज्य परिवहन महामंडळाच्या वाहकाला मिळणारी अग्रीम धनाची रक्कम आता १०० रुपये झाली आहे. मात्र एसटीच्या बँकेकडून वाहकाला चिल्लरऐवजी शंभरची एक नोट अथवा काही नोटा मिळतात. त्यामुळे प्रवासादरम्यान चिल्लरवरुन प्रवासी वर्गासोबत वाहकाला सतत तोंड द्यावे लागत आहे.
एसटीचे वाहक प्रवास भाड्याची रक्कम तिकीट देऊन जमा करतात. महामंडळाचे उत्पन्न ज्याच्या हातून येते, त्या वाहकाला एसटीच्या बँकेकडून १० रुपयांचे अंतिम धन दिले जात आहे. १० रुपयांमध्ये चिल्लरचा समावेश असावा, असाही आग्रह धरला होता. मात्र त्याकडे प्रशासनाने कायम दुर्लक्ष केले. त्यामुळे वाहकाला नोकरीमध्येच प्रचंड असलेला त्रास कमी झालाच नाही.
प्रवाशाने तिकीट काढल्यानंतर त्याला उर्वरित रक्कम परत देण्यासाठी प्रवाशांकडूनच येणाऱ्या चिल्लर रुपयांवर आजही वाहकाला विसंबून राहावे लागते. त्यानंतरही चिल्लर जमा न झाल्यास अनेक प्रवासी पैशावरुन वाहकांसोबत वाद घालतात. बऱ्याचदा प्रवाशाचे लक्ष नसल्यास उर्वरित रक्कम घेण्याचे लक्षात राहत नसल्याने त्यांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. अग्रीम धनाची रक्कम वाढविण्याची मागणी वाहकांनी महामंडळाकडे केली होती. बऱ्याचदा प्रवाशाचे लक्ष नसल्यास उर्वरित रक्कम घेण्याचे लक्षात राहत नसल्याने त्यांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे.
अग्रीम धनाची रक्कम वाढविण्याची मागणी वाहकांनी महामंडळाकडे केली होती. मात्र बऱ्याच अवधीनंतर त्यांची मागणी पाच महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात आली आहे. आता अग्रीम धन म्हणून १०० रुपयांची रक्कम एसटी बँकेकडून वाहकांना मिळत आहे. मात्र सध्याच्या काळात ही रक्कम फारच कमी आहे. त्यातच वाहकांना शंभरची नोटी दिली जाते. काहीना थोड्या फार दहा वीस पन्नासच्या नोटा मिळून शंभर रुपये दिले जातात. परंतु चिल्लर रक्कम वाहकांना मिळत नाही. शिवाय प्रशासनाकडून तसे प्रयत्न केले जात नसल्याची खंत वाहकांनी केली. सध्याही वाहकांजवळ चिल्लर रक्कम राहत नसल्याने प्रवाशांसोबत वाद होत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.
वादामुळे प्रवासी होतात त्रस्त
बसमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवासी वर्गाची गर्दी राहते. चिल्लर रक्कम परत घेण्यावरुन प्रवाशांसोबत वाहकांचे वाद होतात. या वादामुळे बसमध्ये असलेल्या इतर प्रवासी वर्गाला विनाकारणच त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे अशा बसचा संपूर्ण प्रवास हा कंटाळवाणा होत असल्याचे चित्र निर्माण होत आहे.