विमा कंपन्यांचे जाचक निकष
By Admin | Updated: March 13, 2015 00:23 IST2015-03-13T00:23:53+5:302015-03-13T00:23:53+5:30
महसूल मंडळस्तरावर हवामान घटकाच्या नोंदी घेण्याकरिता नोंदणीकृत त्रयस्त संस्थेमार्फत स्वयंचलीत संदर्भ हवामान केंद्र उभारणी करणेबाबत विमा कंपनी कारवाई करेल,...

विमा कंपन्यांचे जाचक निकष
अमरावती : महसूल मंडळस्तरावर हवामान घटकाच्या नोंदी घेण्याकरिता नोंदणीकृत त्रयस्त संस्थेमार्फत स्वयंचलीत संदर्भ हवामान केंद्र उभारणी करणेबाबत विमा कंपनी कारवाई करेल, असे सांगण्यात आले.
अमरावती जिल्ह्यातील सोयाबीन पिकाकरिता १९,००० विमा संरक्षित रक्कम ७.७० टक्केवारी व १४६३ रूपये प्रतिहेक्टर वास्तवदर्शी विमा हप्ता हे सूत्र कृषी विभागाने सांगितले. कापसाकरिता २२ हजार रूपये विमा संरक्षित रक्कम ११.२७ टक्केवारी व २४६४ रूपये प्रतिहेक्टर वास्तवदर्शी हप्ता असे सूत्र होते. यामधील ५० टक्के रक्कम शेतकऱ्यांची, २५ टक्के राज्य सरकार व २५ टक्के केंद्र शासनाने भरणा केला. विमा संरक्षित कालावधी संपल्यानंतर ४५ दिवसांत या विमा कंपनीकडून भरपाई मिळणार होती. प्रत्यक्षात विम्याच्या हिस्स्याईतपतही भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही. विमा कंपनीच्या जाचक निकषामुळे अवेळी पाऊस, नैसर्गिक आपत्ती यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही शेतकऱ्यांना त्या प्रमाणात मदत मिळू शकली नाही. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांऐवजी विमा कंपन्याचे हित जपले, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे.
उडदाला विमाहप्त्याएवढी भरपाई नाही
जिल्ह्यातील ११ शेतकऱ्यांनी ११.६६ हेक्टर क्षेत्राकरिता १७ हजार ९३० रूपये हप्ता भरून १ लाख ६३ हजार २४० रूपयांचे पीक विमा संरक्षण केले. प्रत्यक्षात नुकसान भरपाई मात्र १३,२१६ रूपये मिळाली. यामुळे ही शेतकऱ्यांची निव्वळ थट्टा केल्याची चर्चा सुरू आहे.