इयत्ता १ ते १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत सवलत
By Admin | Updated: January 14, 2016 00:18 IST2016-01-14T00:18:18+5:302016-01-14T00:18:18+5:30
विशेष गरजा असणाऱ्या इयत्ता १ ते १२ वी पर्यंच्या विद्यार्थ्यांचे इतर सामान्य विद्यार्थ्यांच्या बरोबरीने प्रत्येक घटकात मूल्यमापन होऊ शकत नाही.

इयत्ता १ ते १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत सवलत
विशेष गरजा असणारे विद्यार्थी : सामान्य पातळीपर्यंत आणण्याचा उद्देश
अमरावती : विशेष गरजा असणाऱ्या इयत्ता १ ते १२ वी पर्यंच्या विद्यार्थ्यांचे इतर सामान्य विद्यार्थ्यांच्या बरोबरीने प्रत्येक घटकात मूल्यमापन होऊ शकत नाही. त्यांच्या ज्ञानाच्या व भाषेच्या मूल्यमापन पद्धतीने सामान्य मुलांपेक्षा वेगळ्या असणे अपेक्षित आहे. त्यानुसार वर्ग १ ते ८ पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धतीत आणि वर्ग ९ ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षसाठी सवलत देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.
विशेष गरजा असणाऱ्या (दिव्यांग) म्हणजेच अंशत: अंध/पूर्णत: अंध मतिमंद, कर्णबधीर, अस्तिव्यंग, बहुविकलांग, स्वमग्न, सेरेबल पाल्स, अध्ययन अक्षम अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक मूल्यापनामध्ये गरजेनुसार सोयी सवलती देण्यासंदर्भात शासन स्तरावरुन समिती गठित करण्यात आली होती. या समितीच्या शिफारसीनुसार या विद्यार्थ्यांना सवलती देण्याचा निर्णय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी घेतला.
अंशत: व पूर्णत: अंध विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार जवळचे परीक्षा केंद्र राहणार आहे.
कर्णबधिर विद्यार्थ्यांनाही सवलत
विद्यार्थ्यांना त्यांच्या सोईसुनार जवळचे परीक्षा केंद्र
पेपर सोडविण्यासाठी प्रती तास ३० मिनिटे अधिक
नापास विद्यार्थ्यांना २० गुणांची एका विषयात सवलत
प्रश्नांचे उत्तर अपेक्षीत शब्द मर्यादेपेक्षा कमी शब्दात
गरजेप्रमाणे त्यांना अनुकूल असणारे प्रश्नपत्रिकेत फेरबदल
स्पेलिंग, व्याकरण, चुकांचे गुण कमी करता येणार नाही.
गणितीय शब्द रचना सरळ व सोपी असावी
मौखिक मुख्य मापनासाठी लेखीचा पर्याय
स्वमग्न विद्यार्थ्यांना त्यांचीच शाळा केंद्र
स्वमग्न विद्यार्थी (आॅटिस्टिक) शिक्षण घेतात तिच शाळा परीक्षा केंद्र राहणार आहे. त्यांच्या शाळेतच या मुलांसाठी विशेष तयार केलेले टेबल, टायपिंग मशीन, कॉम्प्युटर, खुर्च्या यांची व्यवस्था करावी लागणार आहे. परीक्षेला प्रतितास २० मिनिटे वेळ अधिक व नापास झाल्यास २० गुणांची सवलत परीक्षेसाठी लेखनिकांची मदत, आकृत्या, नकाशे काढण्याची सवलत राहिल.
२० मिनिटे अधिक वेळ
उत्तरपत्रिका टाईप करुन वा लिहून देण्याची परवानगी त्यांना पूर्ण किंवा पेपरचा काही भाग लिहिण्यासाठी लेखनिकांची परवानगी जे विद्यार्थी स्वत: पेपर सोडवितात त्यांना मधात थकवा आल्यास शाळेचा अध्ययनाशी संबंध नसणारा कोणीही कर्मचारी मदत करु शकेल.