महापालिकेच्या मालमत्ता करात माजी सैनिकांना सूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:10 IST2021-07-18T04:10:28+5:302021-07-18T04:10:28+5:30
अमरावती : राज्यात अधिवास करणाऱ्या सर्व माजी सैनिकांना आणि माजी सैनिकांच्या विधवा यांना मालमत्ता करात सूट देण्यात येत आहे. ...

महापालिकेच्या मालमत्ता करात माजी सैनिकांना सूट
अमरावती : राज्यात अधिवास करणाऱ्या सर्व माजी सैनिकांना आणि माजी सैनिकांच्या विधवा यांना मालमत्ता करात सूट देण्यात येत आहे. बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक कल्याण योजनेंतर्गत हा लाभ मिळणार आहे. महापालिका क्षेत्रात अंमलबजावणी होण्याकरिता नगरविकास विभागाचे पत्र महापालिकेला प्राप्त झाले आहे. त्या अनुषंगाने २० जुलैच्या आमसभेत हा प्रशासकीय विषय सभागृहासमोर येणार आहे.
नगरविकास व ग्रामविकास विभागाद्वारा शासन आदेशाचे एकत्रीकरण करून बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजनेत माजी सैनिक, सैनिक विधवा यांना मालमत्ता करात सूट दिलेली आहे. ही योजना प्रभावीपणे राबवावी, असे शासनादेशात नमूद आहेत. याअनुषंगाने प्रशासनाद्वारा हा विषय २० जुलैच्या आमसभेत सभागृहासमोर अवलोकनार्थ ठेवण्यात येणार आहे.
२३ नोव्हेंबर २०२० च्या शासनादेशानूसार या योजनेचा लाभ मिळण्यासाठी माजी सैनिक राज्यात जन्मलेला किंवा १५ वर्षाचा रहिवासी असावा व त्याकरीता त्याने सक्षम प्राधिकाऱ्याकडून अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ संबंधित माजी सैनिक व त्यांच्या पत्नी/ विधवा हजात असेपर्यतच देय राहणार आहे. अविवाहित सैनिकांच्या बाबतीत त्यांचे आईवडील हयात असेपर्यत हे लाभ देय राहणार असल्याचे शासनादेशात नमुद आहे.