शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींच्या यादीतून 'ओराॅन, धांगड ' जमात वगळा! ट्रायबल फोरमची मागणी

By गणेश वासनिक | Updated: September 29, 2024 15:22 IST

राज्यपालांना निवेदन

गणेश वासनिक, अमरावती : महाराष्ट्रात अनुसूचित जमातीच्या यादीतील क्रमांक ३६ वर असलेली ओराॅन, धांगड जमात राज्यात अस्तित्वात नाही आणि धांगड जमात (धनगड) ही धनगर नसल्याचे वारंवार स्पष्ट झाल्यामुळे आदिवासींच्या यादीतून वगळण्यात यावे, अशी मागणी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे 'ट्रायबल फोरम' संघटनेने २८ सप्टेंबर रोजी केली आहे.

'ओरॉन' ही देशातील प्रमुख जमात असून, तिची पोटजमात धांगड आहे. महाराष्ट्रात अनुसूचित जमाती यादीत क्रमांक ३६ वर ओरॉन, धांगड जमात आहे. पण ही जमात राज्यात अस्तित्वात नाही. मात्र राज्यात धांगड या इंग्रजी शब्दाचा अनुवाद धनगड असा करून घेतला आहे, असा आरोप संघटनेने निवेदनातून केला आहे. अनुसूचित जमातीच्या सूचीतील धांगड (धनगड) हा शब्द धनगरच आहे, असा दावा धनगर समाज करत आहे. पण धनगर या जातीचा धांगड या जमातीशी तिळमात्रही संबंध नाही. तथापि, धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यासाठी कायद्याच्या विहित पद्धतीचा अवलंब करून ‘धनगर’ आणि ‘धनगड’ एकच आहेत, असा स्वतंत्र जीआर राज्य सरकार काढणार असल्याचा निर्णय १५ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. राज्य सरकारचा हा निर्णय घटनाबाह्य असून, केंद्र शासनाचे निकष, न्यायालयीन निर्णयाशी विसंगत आहे, असे निवेदनातून म्हटले आहे.सरकारने स्वतःचाच प्रस्ताव मागे घेतला

राज्य सरकारने धनगर समाजाचा अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश करण्यासाठी १२ जून १९७९ रोजी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला होता. पण धनगर समाज आदिवासींचे निकष पूर्ण करू शकत नसल्यामुळे हा प्रस्ताव केंद्र सरकारने नाकारला आणि अखेर राज्य शासनाला धनगर आरक्षण प्रस्ताव १९८१ मध्ये मागे घ्यावा लागला. त्यामुळे समावेशासंदर्भात प्रश्नच निर्माण होत नाही.उच्च व सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळले

धनगरांना अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण मिळावे, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात २०१८ मध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. धनगर आणि धनगड एक नसल्याचे सांगत उच्च न्यायालयाने १६ फेब्रुवारी २०२४ रोजी याचिका फेटाळून लावली आहे. या निर्णयाविरुद्ध धनगर समाजाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तीसुद्धा याचिका फेटाळून लावली आहे.घटनेचे अनुच्छेद ३४२ (२) नुसार संसदेला कायद्याद्वारे कोणतीही जनजाती किंवा जनजाती समाज त्यातील गट खंड (१) खाली काढलेल्या अधिसूचनेत विनिर्दिष्ट केलेल्या अनुसूचित जनजातीच्या सूचीत समाविष्ट करता येईल किंवा त्यामधून वगळता येईल. हा अधिकार राष्ट्रपती व संसदेचा आहे. राज्य सरकारने त्यांचा अधिकार हिरावून घेऊ नये, तो अबाधित ठेवावा. - दिनेश टेकाम, जिल्हाध्यक्ष, ट्रायबल फोरम, अमरावती

 

टॅग्स :reservationआरक्षण