चांदूर बाजार येथे शिवराज्यभिषेक दिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:16 IST2021-06-09T04:16:08+5:302021-06-09T04:16:08+5:30

चांदूर बाजार - स्थानिक शिवतीर्थ येथे शिवराज्यभिषेक दिन तालुक्यातील शिवप्रेमींनी उत्साहात साजरा केला. यावेळी शरद क्रीडा व सांस्कृतिक ...

Excitement on Shiv Rajyabhishek Day at Chandur Bazaar | चांदूर बाजार येथे शिवराज्यभिषेक दिन उत्साहात

चांदूर बाजार येथे शिवराज्यभिषेक दिन उत्साहात

चांदूर बाजार - स्थानिक शिवतीर्थ येथे शिवराज्यभिषेक दिन तालुक्यातील शिवप्रेमींनी उत्साहात साजरा केला. यावेळी शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया हे प्रामुख्याने उपस्थित होते.

दरवर्षी तालुक्यातील शिवप्रेमी शिवराज्यभिषेक दिनी स्थानिक शिवतीर्थ येथे अश्वरूढ शिवप्रतिमेचे पूजन करतात. यावेळी चांदूर बाजारचे नगराध्यक्ष नितीन कोरडे, पोलीस निरीक्षक सुनील किनगे, ठाणेदार दीपक वळवी, मराठा सेवा संघाचे संतोष कोठाळे, प्रमोद ठाकरे, नितीन देशमुख, मंगेश चौधरी, कार्यक्रमाचे संयोजक डॉ. तुषार देशमुख, उपसरपंच मनीष एकलारे, शरद क्रीडा प्रतिष्ठानचे राज्य उपाध्यक्ष नंदकुमार बंड, पंकज आवारे, मदन भाटे, नगरसेवक सचिन खुळे, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे भूषण चरपे, प्रसेनजित देशमुख, गौरव देशमुख, शिवाजी वाकोडे, सुयोग गोरले यांच्यासह गोकुलधाम मित्रमंडळाचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Excitement on Shiv Rajyabhishek Day at Chandur Bazaar