एक्साईजची अवैध दारूविरुद्ध धडक मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 05:00 IST2020-04-22T05:00:00+5:302020-04-22T05:00:51+5:30

एक्साइजचे अधीक्षक राजेश कावळे यांच्या मार्गदर्शनात अमरावती व बडनेरा चमूने विविध ठिकाणी गावठी दारू विक्री, वाहतुकीवर धाडसत्र राबविले. यात छत्रीतलाव मार्ग, भानखेडा रोड, गोंविदपूर, घोडगव्हाण व बडनेरा मार्गावर गावठी दारू निर्मिती आणि विक्रीस्थळी धाड टाकण्यात आली. ग्रामीण भागात अवैध गावठी दारूची निर्मिती होत असल्याचे कारवाईअंती स्पष्ट होते.

Excise crackdown on illegal alcohol | एक्साईजची अवैध दारूविरुद्ध धडक मोहीम

एक्साईजची अवैध दारूविरुद्ध धडक मोहीम

ठळक मुद्दे१४ आरोपी, सात दुचाकी : ३ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : लॉकडाऊनच्या काळात शासनमान्य मद्यविक्री दुकाने बंद आहेत. त्यामुळे अलीकडे अवैध गावठी दारूविक्रीचा गोरखधंदा सुरू झाला आहे. त्याविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाने गावठी दारू विक्रीविरुद्ध धडक मोहीम उघडली. सोमवार, मंगळवार अशा दोन दिवसात १४ आरोपींसह सात दुचाकी जप्त करण्यात आल्या. ३ लाख ३२ हजार ६८५ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
एक्साइजचे अधीक्षक राजेश कावळे यांच्या मार्गदर्शनात अमरावती व बडनेरा चमूने विविध ठिकाणी गावठी दारू विक्री, वाहतुकीवर धाडसत्र राबविले. यात छत्रीतलाव मार्ग, भानखेडा रोड, गोंविदपूर, घोडगव्हाण व बडनेरा मार्गावर गावठी दारू निर्मिती आणि विक्रीस्थळी धाड टाकण्यात आली. ग्रामीण भागात अवैध गावठी दारूची निर्मिती होत असल्याचे कारवाईअंती स्पष्ट होते. गावठी दारू अमरावती व बडनेरा शहरात दुचाकीने आणत असल्याबाबत गोपनीय माहितीच्या आधारे एक्साइजचे भरारी पथक, निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांनी ही संयुक्त कारवाई केली. दोन दिवसांत २२५ लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. एक्साइजचे निरीक्षक डी.बी. कोळी, दुय्यम निरीक्षक अनिस शेख, टी. जी. लव्हाळे, के.जी. पुरी, अरविंद नांदणे, सुमीत काळे, पंकज भारती, देवराम सारवे, कष्टे, तिडके, राहुल जयस्वाल, सुजित जाधव, रूपेश मोकलकर आदींनी सहभाग घेतला.

गावठी दारू विक्री फोफावली
लॉकडाऊनमुळे देशी, विदेशी मद्यविक्री बंद आहे. त्यामुळे अवैध दारू विक्रेत्यांना सुगीचे दिवस आले आहे. परिणामी गत आठवड्यापासून राबवित असलेल्या विविध धाडसत्रात एक्साईजने गावठी दारू निर्मिती, वाहतूकविरूद्ध कारवाई केल्याचे स्पष्ट होते. ग्रामीण भागात गावठी दारू निर्मितीचे अड्डे असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईतून पुढे आले आहे. हे गावठी दारूचे अड्डे नेस्तनाबूत करणे एक्साईजसह पोलिसांना आव्हान ठरणारे आहे.

Web Title: Excise crackdown on illegal alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.