अति उष्णतामानामुळे संत्राफळांची गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:13 IST2021-04-08T04:13:04+5:302021-04-08T04:13:04+5:30
फोटो - ०७ एस नांदगाव नांदगाव खंडेश्वर : संत्राबागेतील आंबिया बहाराची फळे अति उष्णतामानाने गळत आहे. गेल्या पंधरा दिवसापूर्वी ...

अति उष्णतामानामुळे संत्राफळांची गळती
फोटो - ०७ एस नांदगाव
नांदगाव खंडेश्वर : संत्राबागेतील आंबिया बहाराची फळे अति उष्णतामानाने गळत आहे. गेल्या पंधरा दिवसापूर्वी तालुक्यात अवकाळी पाऊस झाला होता. त्यामुळे उष्णतामान कमी होऊन हवेत गारवा निर्माण झाला होता. पण, आता एकाएकी तापमान वाढल्याने हवामानातील बदलाच्या परिणामामुळे संत्राफळांना गळती लागली आहे.
तालुक्यात ८२० हेक्टर क्षेत्रावर संत्राबागा आहेत. आंबिया बहराची आवळ्याच्या आकाराची फळे लागली आहेत. हवामानात बदल होऊन उष्णतामानात वाढल्याने ही फळे गळत आहेत. या शेतकऱ्यांनी हवामानावर आधारित पीक विमा काढला आहे. कृषी विभागाने नुकसानीची पाहणी करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
-----------------
येणस शिवारात पाच एकर संत्राबाग आहे. अति उष्णतामानामुळे झाडावरची फळे गळत आहे. झाडावरील जवळपास अर्धा माल गळाला. तालुक्यातील संत्राबागांतील हीच परिस्थिती आहे.
- मनोज वसंतराव कडू, शेतकरी, येणस